जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 92.57 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.11- रायगड
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 92.57 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी
1716.29 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 35.00 मि.मि., पेण-155.00 मि.मि.,
मुरुड-9.00 मि.मि., पनवेल-140.00 मि.मि., उरण-125.00 मि.मि., कर्जत-115.80 मि.मि.,
खालापूर-122.00 मि.मि., माणगांव-115.00 मि.मि., रोहा-147.00 मि.मि., सुधागड-65.00
मि.मि., तळा-72.00 मि.मि., महाड-114.00 मि.मि., पोलादपूर-108.00 म्हसळा-45.20
मि.मि., श्रीवर्धन-11.00 मि.मि., माथेरान-102.10 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान
1481.10 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 92.57 मि.मि. इतकी आहे.
एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 54.61 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment