अनुकंपा प्रतिक्षा यादी प्रसिद्ध



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.11- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या एकत्रित गट-क व ड संवर्गातील सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर  संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयात व जिल्हा संकेतस्थळ (www.raigad.gov.in) यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर यादीतील नाव व क्रमांकाबाबत उमेदवारांची हरकत/आक्षेप असल्यास उमेदवारांनी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या मार्फत आपले हरकत अर्ज 25 जुलै पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत. यानंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घेण्यात यावी , असे तहसिलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक