जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 35.14 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.12- रायगड
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 35.14 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1751.43
मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 2.00 मि.मि., पेण-11.40 मि.मि., मुरुड-8.00
मि.मि., पनवेल-5.60 मि.मि., उरण-10.00 मि.मि., कर्जत-67.30 मि.मि., खालापूर-42.00
मि.मि., माणगांव-54.00 मि.मि., रोहा-47.00 मि.मि., सुधागड-16.00 मि.मि., तळा-64.00
मि.मि., महाड-60.00 मि.मि., पोलादपूर-44.00 म्हसळा-67.40 मि.मि., श्रीवर्धन-20.00
मि.मि., माथेरान-43.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 562.20 मि.मि.इतके आहे.
त्याची सरासरी 35.14 मि.मि. इतकी आहे.
एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 55.73 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment