मातृसुरक्षा दिनानिमित्त गरोदर,स्तनदा मातांना मार्गदर्शन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.11- जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील बाह्यरुग्ण विभागात मंगळवारी (दि.10)मातृ सुरक्षा दिन साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल भुसारे, यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
मातृ सुरक्षा दिनामिनिमित्त  गरोदर माता यांना गरोदरपणात घ्यावयाची काळजी याबाबत डॉ.अनिल फुटाणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच आहारतज्ज्ञ शंकर फुलवाले यांनी गरोदरपणात घ्यावयाचा पोषक आहार याबाबत माहिती दिली. जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थींनीनी मातांनी प्रसुतीपश्चात स्तनपान कसे करावे याची माहिती छायाचित्राद्वारे दिली.                                                        
या  कार्यक्रमास   गरोदर माता, जिल्हा रुग्णालयातील अधिसेविका श्रीमती मोरे, सर्व आंतरुग्ण कक्षातील परिसेविका व माताबाल संगोपन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक