जागतिक लोकसंख्या दिन : जिल्हा रुग्णालयात प्रभात फेरी; पंधरवडाभर कार्यक्रम



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.11- जागतिक लोकसंख्या दिन (दि.11 जुलै) निमित्त  जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग व रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थींनी व रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वर्षाचे घोषवाक्य  एका अर्थपूर्ण भविष्याची सुरुवात करु या-कुटुंब नियोजनाची साथ धरु या’ हे आहे.
या प्रभातफेरी मध्ये लोकसंख्या नियंत्रणाविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच बाह्यरुग्ण विभागात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यावेळी उपस्थित होते.
            जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थींनींनी जागतिक लोकसंख्या दिनाविषयी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. स्त्रि रोग तज्ज्ञ डॉ.मेघा घाटे यांनी कुटुंब नियोजन पध्दतीबाबत माहिती दिली.
यानिमित्ताने 27 जून ते 10 जुलै, 2018 हा दांम्पत्य संपर्क पंधरवडा म्हणून साजरा करण्यात आला. या पंधरवड्यामध्ये आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत जनसामान्यांमध्ये लग्नाच्या वेळीचे वय लांबविणे, दोन जन्मांमध्ये पुरेसे अंतर, प्रसुती पश्चात गर्भपात यानंतर कुटुंब नियोजन पध्दतीचा अवलंब याबाबींचा प्रामुख्याने प्रचार व प्रसार करण्यात आला. तसेच 11 ते 24 जुलै या कालावधीमध्ये लोकसंख्या स्थिरता पंधरवडा साजरा करण्यात येणार असून आरोग्य विभागामार्फत विविध शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमाकरीता अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, प्रशासकीय अधिकारी रा.जि.प. अलिाबाग डॉ.शैलेश घालवाडकर, प्रशासकीय अधिकारी जि.रु.डॉ.निशा तेली, निवासी वैद्यकीय अधिकरी (बाह्यसंपर्क) डॉ.अमोल भुसारे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.अर्चना सिंग, अधिसेविका श्रीमती मोरे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्रीमती उषा वावरे व श्रीमती नम्रता नागले, राजेंद्र भिसे, रा.जि.प. तसेच रुग्णालयातील व आरोग्य विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथील अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्ण्‍ व रुग्णांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक