गेल(इंडिया) चे वरसोली समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान व वृक्षारोपण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.10- उसर ता. अलिबाग येथे कार्यरत गेल (इंडिया) लिमिटेड, या कंपनीतर्फे वरसोली ता. अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर सोमवार (दि.9) स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत गेल कंपनी संपूर्ण देशभर आपल्या सर्व युनिट्समध्ये स्वच्‍छ रत मिशन अंतर्गत लोकांमध्‍ये स्वच्छतेविषयीची जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवित आहे.  त्याअंतर्गत वरसोली  समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.  यावेळी उप विभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, गेल कंपनीचे मुख्‍य सरव्यवस्थापक प्रसून कुमार, तहसिलदार प्रकाश सकपाळ, वरसोलीचे सरपंच मिलिंद वळे, महाप्रबंध के. त्‍यागराजन हे मान्यवर उपस्थित  होते.  तसेच गेल कर्मचारी, स्थानिक लोक, वरसोली ग्रामपंचायत सदस्‍य, अलिबाग येथील जे. एस. एम. महाविद्यालयातील एन.एस.एस. कॅडेट व अन्‍य विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी साऱ्यांसह स्वच्छतेची शपथ घेतली.  यावेळी वरसोली समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात नारळाचे 100 झाडांची लागवड करण्यात आल.
गेल कंपनीतर्फे येत्या १५ जुलैपर्यंत र येथील प्लांटमध्ये स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन केलेले आहे. स्वच्छतेविषयी जागरुकता वाढविण्यासाठी, सार्वजनिक ठिकाणी, अजुबाजुचे गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी स्‍वच्‍छ भारत मिशन या विषयावर रेखाचित्रे / चित्रकला स्पर्धा यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा या स्‍वच्‍छता पंधरवड्यात केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक