राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम नवीन पिढी सदृढ आणि निरोगी होण्यासाठी लाभदायक ----पालकमंत्री श्रीमती आदिती तटकरे



अलिबाग, जि. रायगड, दि.19 (जिमाका)- शासनाच्या आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम शहरी व ग्रामीण राबविण्यात आली असून यामध्ये 0 ते 5 वयोगटातील  बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे शासनाचा हा स्तुत्य उपक्रम असून ही लसीकरण मोहिम नवीन पिढी सदृढ आणि निरोगी होण्यासाठी लाभदायक असल्याचे,  प्रतिपादन राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा श्रीमती आदिती तटकरे यांनी आज येथे केले.   पनवेल येथे रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन व लाईफ लाईन हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पल्स पोलिओ लसीकरण मोहिम कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
            यावेळी पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, उपविभागीय अधिकारी पनवेल दत्तू नवले,पोलीस उपायुक्त अशोक दुधे,जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अजित गवळी आदि मान्यवर उपस्थित होते. 
            यावेळी पालकमंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या की, 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ सारख्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी या लसीचा डोस देण्यात येत असून ही मोहिम  जिल्ह्यातील  ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात येत असते.  त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी  घेऊन आपली पुढील पिढी सदृढ व निरोगी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.  यासाठी सर्वांना आरोग्य विषयक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.    कोणीही बालक या डोस पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.    याकरिता 0 ते 5 वर्षाखालील  सर्व बालकांना पोलिओची लस पाजून कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी पालकमंत्री श्रीमती तटकरे यांच्याहस्ते लाईफ लाईन हॉस्पिटल व  उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे लहान बालकांना पोलिओचा डोसही पाजण्यात आला.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक