25 जानेवारीला 10 वा राष्ट्रीय मतदार दिवस





अलिबाग-दि.21(जिमाका) भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशाप्रमाणे दरवर्षी प्रमाणे 25 जानेवारी 2020 रोजी 10 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवसासाठी Electoral Literacy for Stronger Democracy हा विषय आयोगाने निश्चित केलेला आहे. हा कार्यक्रम जिल्हा स्तरावर, मतदार संघस्तरावर, तालुका स्तरावर व मतदान केंद्रस्तरावर साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय मतदार दिवसाची मराठी भाषेतील शपथ घेणे, नविन नोंदणी झालेल्या मतदारांना बॅच वितरीत करणे, मतदार नोंदणी जागृती बाबत चित्रफित दाखविणे, युवक मतदार महोत्सव साजरा करणे, निवडणूक साक्षरता क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर तसेच मतदारसंघ स्तरावर शाळा, कॉलेजमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील कार्यक्रम 25 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता पी.एन.पी. नाट्यगृह अलिबाग बायपास रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
25 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8 वाजता अरुणकुमार वैद्य हायस्कूल अलिबाग ते पी.एन.पी. नाट्यगृह अलिबाग बायपास रोड या मार्गे शालेय विद्यार्थी, एन.सी.सी. एन.एस. एस. स्कॉऊट गाईड तसेच भावी युवा मतदार यांचे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक व मतदान विषयावर आधारीत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, रांगोली स्पर्धा यामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मतदार यादी संदर्भात उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer) यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. 10 व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने महिला, युवक, अपंग व्यक्ती, जेष्ठ नागरीक, सेनादलातील मतदार, अनिवासी भारतीय तसेच समाजातील दुर्लक्षीत घटक यांना सदर कार्यक्रमात समाविष्ट करुन घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा व कॉलेज यामध्ये निवडणूक साक्षरता क्लब (Election Literacy Club) मतदान केंद्र स्तरावरील चुनाव, पाठशाळा, शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये VAF यांच्या माध्यामातून मतदार साक्षरता कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी 10 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक