अन्न व औषध प्रशासन म.रा.रायगड पेण तर्फे प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू रु.80 लाखाचा साठा जप्त


अलिबाग-दि.21(जिमाका)गुटखा, पान मसाला, चघळण्याची तंबाखू यांच्या रुपात आढळून आलेल्या तंबाखू, सुपारी व त्यात वापरण्यात येणारी अनेक अपमिश्रकांच्या घातक परिणामुळे ॲक्युट हायपर मॅग्नेशिया, ह्दयरोग, मुखाचा कर्करोग, अन्न नलिकेचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, जठर, आतडे व श्वसन या संबंधिचे आजार होत असून गुटखा, पान मसाला, चघळण्याची तंबाखू यांचे व्यसन लागत असल्यामुळे खाणाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा हिताच्या दृष्टीने अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत कलम 30(2)(अ) नुसार अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन म.रा.मुंबई यांनी गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट/सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट/सुगंधित सुपारी, अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखू, खर्रा, मावा यांची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्री यास दि.20 जुलै 2019 पासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध करण्यात आला आहे.
गुरुवार दि.9 जानेवारी, 2020 रोजी किरवली टोलनाका, तळोजा, ता.पनवेल परिसरात अन्न व औषध प्रशासन म.रा.पेण-रायगड व वस्तू आणि सेवाकर विभागातील अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीवरुन प्रतिबंधित गुटखा व पान मसाला या अन्नपदार्थाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक-टाटा आयशर ट्रक क्र.एम.एच.04, एफ.डी.-9953 आणि ट्रक क्र.एम.एच.04, एच.वाय.-3889 या वाहनातून मधून रु.78,45,024/- चा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त करुन दोन्ही ट्रक जप्त करुन सुरक्षिततेच्या दृष्टीने तळोजा पोलीस स्टेशन येथे जमा केले आहेत. संबंधित प्रकरणी वाहनचालक, वाहन मालक व पुरवठादार या आरोपी विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व भा.दं.वि.कलम 328, 188, 273 व 274 अंतर्गत तळोजा पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल दाखल केला असून पुढील तपास चौकशी सुरु आहे. त्याच प्रमाणे प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वरील दोन्ही ट्रकचे  वाहतूक परवाने रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई जि.पालघर यांना कळविण्यात आले आहे.
सदरची कारवाई शिवाजी देसाई, सह आयुक्त (अन्न) ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) लं.अ.दराडे, यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी बा.औ.शिंदे, श्रीमती सु.ना.जगताप व श्रीमती प्रियंका भंडारकर यांनी कार्यालयातील कर्मचारी, प्र.मा.पवार, वरिष्ठ लिपिक ना.द.वस्त, दे.मो.पाटील, म.भि.भगत यांच्या मदतीने कार्यवाही केली आहे.
रायगड जिल्हयात छुप्या पद्धतीने विक्री होत असलेल्या ठिकाणी वेळोवेळी अन्न व औषध प्रशासन म.रा.पेण रायगड कार्यालयाने स्थानिक नागरीक व पोलीस यांच्या मदतीने धाडी व जप्तीची कारवाई करीत आहे.
तरी रायगड जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, रायगड जिल्ह्यात कोठेही छुप्या पद्धतीने प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट, सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट सुगंधित सुपारी, अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखू, खर्रा, मावा यांची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्री होत असल्यास प्रशासनाचा टोल फि क्रमांक 1800222365 या क्रमांकावर अथवा कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 02143-252085 या क्रमांकावर संपर्क साधावा.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक