केंद्र शासनाच्या योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवा---खासदार श्रीरंग बारणे




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29-  केंद्र शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना असून त्यांची अंमलबजावणी करुन त्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवा, असे निर्देश खासदार तथा अध्यक्ष जिल्हा विकास  समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती श्रीरंग बारणे यांनी आज येथे दिले.  जिल्हा नियोजन भवन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
            यावेळी खासदार सुनिल तटकरे, आमदार सर्वश्री आ. भरतशेठ गोगावले, आ.महेंद्र थोरवे, आ.महेंद्र दळवी, आ.रविशेठ पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती योगिता पारधी,  कोकण विभागीय अधिकारी शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, तसेच सर्व शासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी,कर्मचारी, जिल्हा विकास  समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.
            यावेळी खा.श्री.बारणे म्हणाले की, जिल्ह्यातील जनतेसाठी केंद्र शासन अंगिकृत असलेल्या अनेक योजना शासन राबवित असून या योजनांच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.  महात्मा गांधी रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक मदत कार्य, प्रधानमंत्री आवास योजना(शहरी), स्वच्छ भारत मिशन अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम, प्रधानमंत्री सिंचन योजना, दीन दयाळ उपाध्याय, प्रधानमंत्री फसल विमा योजना,प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अशा अनेक विविध असलेल्या  योजनांचा लाभ शहरी तसेच ग्रामीण जनतेला देण्यात यावा अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.  जिल्ह्यातील कोणताही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.  तसेच जिल्हृयात राबविण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या विविध योजना संदर्भातील आढावा त्यांनी यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाकडून जाणून घेतला.  बैठकीच्या प्रारंभी दु:खवट्याच्या मंजूर ठरावाचे वाचन करुन श्रदांजली अर्पण करण्यात आली.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक