'माविम' रायगडची सर्वोत्कृष्ट कामगिरी;राज्यात प्रथम क्रमांक



अलिबाग, जि. रायगड, दि.30 (जिमाका)- महिला आर्थिक विकास महामंडळाची तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण योजने अंतर्गत राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठक नुकतीच (दि.२४ व२५) अलिबाग येथे पार पडली. या बैठकीत झालेल्या राज्यस्तरीय आढाव्यानंतर सन २०१७-१८ मध्ये १९ जिल्ह्यामधून रायगड जिल्ह्यास विविध घटकनिहाय उत्कृष्ट काम केल्या  बद्दल प्रथम पारितोषिक देऊन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक इंद्रा मालो (भा.प्र.से.) यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अन्य जिल्ह्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र  देऊन गौरविण्यात आले.
महिला आर्थिक विकास महामंडळाची तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण योजने अंतर्गत राज्यस्तरीय वार्षिक आढावा व नियोजन बैठक दि. २४ व २५ मार्च २०१८ रोजी हॉटेल रॅडिसन ब्ल्यू,अलिबाग या ठिकाणी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी (भा.प्र.से.), माविमच्या  उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंद्रा मालो, (भा.प्र.से.), महाव्यवस्थापक (प्रकल्प) कुसुम बाळसराफ, व महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) राजस कुंटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस राज्यातील ३५ जिल्ह्यातील अधिकारी / कर्मचारी वर्ग उपस्थित होता. मुख्यालयामार्फत सन २००७ ते २०१८ या कालावधीतील विकासात्मक आढावा सादर करण्यात आला. तसेच विभागीय सनियंत्रण व मुल्यांकन अधिकारी यांच्या मार्फत सन २०१७-१८ या कालावधीमधील विभागवार झालेल्या कामाचा आढावा सादर करण्यात आला. तसेच पुढील वर्षाचे  महत्त्वाचे क्षेत्र मुख्यालयामार्फत मांडण्यात आले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात विविध अधिकाऱ्यांनी आपल्या कला सादर केल्या. कोकण विभागातील सर्व जिल्ह्यामार्फत कोकणी मेव्याचे प्रदर्शन लावण्यात आले त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड