पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.28- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड हे शुक्रवार दि.30 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे-
शुक्रवार दि.30 रोजी दुपारी दीड वा. खरकवाडी, ता. महाड जि. रायगड येथे आगमन व श्री हनुमान जयंती सप्ताह कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी दोन वा. आंब्याचा माळ, ता.महाड, या गावास भेट व गावकऱ्यांशी चर्चा.दुपारी अडीच वा. आंब्याचा माळ ता. महाड येथून किल्ले रायगडकडे प्रयाण. दुपारी साडेतीन वा. जिल्हा परिषद विश्रामगृह, किल्ले रायगड, पाचाड येथे आगमन व शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा.
शनिवार दि.31 रोजी पहाटे पाच वाजता जगदीश्वर पुजा,किल्ले रायगड. सकाळी सहा वाजता श्री हनुमान जयंती उत्सव, किल्ले रायगड, या कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी आठ वाजता श्री शिव समाधी महापुजा. सकाळी नऊ वाजता श्री शिवप्रतिमा पूजन व शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार व गडारोहण स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम.सकाळी सव्वा अकरा वा. श्री शिवप्रतिमा पालखी मिरवणूक (राजदरबार ते शिवसमाधी, किल्ले रायगड). दुपारी साडेबारा वा. श्री छत्रपतींना मानवंदना (सर्व शिवभक्त व रायगड जिल्हा पोलीस) दुपारी दोन वाजता पाचाड, ता. महाड, जि. रायगड येथून मोटारीने पलावा, डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.
0000




Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक