अपघात टाळण्यासाठी अधिसूचना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कमी वेगाने वाहन चालविण्यास मनाई



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27- यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पहिल्या लेन मधुन प्रवास करतांना विहित गतीपेक्षा (ताशी 80 किमी) कमी वेगाने वाहन चालविण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतची अधिसुचना  अपर पोलिस महासंचालक (वाहतूक)  यांनी जारी केली आहे.
या अधिसुचनेनुसार, यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात वाहतूक कोंडी होवू नये यासाठी द्रूतगती मार्गावरील प्रत्येक वाहिनीत तीन लेन असतात. त्यापैकी कार,जीप, टेम्पो या हलक्या वाहनांनी द्रूतगती मार्गाच्या मध्य लेन मधून, जड-अवजड वाहनांनी सर्व्हीस लेनला लागून असलेल्या सर्वात डाव्याकडील लेन मधून प्रवास करणे  अपेक्षित असते.
तसेच त्यांनी केवळ पुढील वाहनास ओलांडतांना (ओव्हरटेक) उजवीकडील लेनचा अवलंब करुन लेन मधून उजवीकडील लेन कायम रिकामी ठेवणे आवश्यक आहे. थोडक्यात पहिली लेन ही ओव्हरटेक करीता आहे. तथापि बरीच वाहने पहिल्या लेन मधून प्रवास करतांना आवश्यक असणाऱ्या विहीत गतीचा (ताशी 80 कि.मी.) वापर न करता त्यापेक्षा कमी गतीने वाहने चालवितात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या चालकांना वाहन चालविण्यास अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची दाट शक्यता असते.
द्रुतगती मार्गावर अपघात टाळण्यासाठी, वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी तसेच लेनच्या शिस्तीचे पालन करणे यासाठी मोटार वाहन कायद्यातील 1988 चे कलम 115 अन्वये अपर पोलीस महासंचालक (वाहतूक)महाराष्ट्र राज्य, मुंबई आर.के.पद्मनाभन, यांनी अधिसूचना जारी केली आहे.  त्याअन्वये रायगड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे व पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावर उजवीकडून लेन ओव्हर टेकींगसाठी राखीव असल्यामुळे पहिल्या लेनमधून प्रवास करतांना विहीत गतीपेक्षा कमी गतीने वाहन  चालविण्यास या मनाई आदेश जारी  करण्यात आला  आहे.
या मनाई आदेशातून अत्यावश्यक सेवा वाहने, रुग्णवाहिका,अग्निशमक वाहने, पोलीस व शासकीय वाहने यांना वगळण्यात आले आहे.
अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, उजवी लेन ही हलक्या वाहनांच्या ओव्हर टेकींगसाठी राखीव असून कमी गतीने वाहन चालविण्यास मनाई असलेबाबत टोल तिकीटावर अटी व शर्ती म्हणून लेखी स्वरुपात नमूद करावी. तसेच अशा प्रकारचे बोर्ड, चिन्हे, फलक,सूचना व तत्स्म योग्य ठिकाणी लावणेबाबतची अंमलबजावणी  महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांनी करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. अधिसूचना पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहील, असे आवाहन अपर पोलीस महासंचालक (वा.) महाराष्ट्र राज्य,आर.के.पद्मनाभन यांनी कळविले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक