माथेरान इको सेन्सेटीव्ह झोन सनियंत्रण समितीची 7 एप्रिल रोजी बैठक



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27- पर्यावरण व वन मंत्रालयाच्या अधिसुचनेद्वारे गठित माथेरान ईको सेन्सिटिव्ह झोन नियंत्रण समितीची बैठक येत्या 7 एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित करण्यात आली आहे. या समितीकडे करावयाच्या तक्रारी, तसेच या क्षेत्रात करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव दिलेल्या मुदतीत जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रायगड यांनी केले आहे.
भारत सरकार, पर्यावरण भवन, नवी दिल्ली परिपत्रकान्वये वासुदेव जी.गोरडे (भा.प्र.से.) सेवा निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 9 सदस्यांची सनियंत्रण समिती दोन वर्षाकरीता गठीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी रायगड हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. सदर समितीची दुसरी बैठक 7 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एम.टी.डी.सी.) विश्रामगृह दस्तुरी माथेरान ता.कर्जत, जि.रायगड येथे आयोजित करण्यांत आलेली आहे.
या संदर्भात भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाकडील दि.04 फेब्रुवारी 2003 च्या अधिसूचनेन्वये रायगड व ठाणे जिल्हयातील एकूण 89 (काही पूर्ण व काही भागत:) गावांचा प्रदेश संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पुर्ण  1 व भागत: 19, एकूण- 20,खालापूर तालुक्यातील भागत:10,पनवेल तालुक्यातील पुर्ण 2 व भागत:38, एकूण- 40,आणि ठाणे जिल्हा अंबरनाथ तालुक्यातील भागत: 19,अशा एकूण 89 गावांचा प्रदेश समाविष्ट आहे.वरील समाविष्ट गावांची यादी संबंधित तहसिलदारांकडे पहावयास उपलब्ध आहे. या गावामधील जो भाग संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाकडील दि.04/02/2003 च्या अधिसुचनेमधील परिच्छेद IV(4) प्रमाणे या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या प्रदेशातील सर्व विकास विषयक कामे, सर्व बांधकामे व बांधकामाचे नुतनीकरण, संवेदनशील क्षेत्रात करावयाचे कोणतेही खाणकाम, तसेच भूगर्भातील पाण्याची विक्री. या कामांना सनियंत्रण समितीच्या पूर्व मान्यतेची आवश्यकता आहे. या समितीकडे कोणास काही तक्रारी करावयाच्या असतील तर त्यांनी अर्ज जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचेकडे सपूर्द करावेत. असे अर्ज सनियंत्रण समितीच्या बैठकीत विचारार्थ घेतले जातील. तसेच विकास करावयाच्या कामासाठी सनियंत्रण समितीची मान्यता घेण्याच्या दृष्टीने आपले प्रस्ताव 10 प्रतीत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग तथा सदस्य सचिव सनियंत्रण समिती यांचेकडे सनियंत्रण समितीच्या बैठकीपूर्वी किमान पाच दिवस अगोदर पाठवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी,रायगड अलिबाग यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक