राष्ट्रीय लोकअदालत 14 ऐवजी 22 एप्रिल रोजी



अलिबाग,जि. रायगड,(जिमाका)दि.28-राष्ट्रीय लोकअदालत शनिवार दिनांक 14 एप्रिल  आयोजित करण्यात आली होती. तथापि या तारखेत बदल करण्यात आला असून आता लोकअदालत रविवार दि.22 एप्रिल रोजी जिल्ह्यात सर्व न्यायालयामध्ये होईल, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मु. गो. सेवलीकर यांनी कळविले आहे. 
या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे,मोटार अपघात प्रकरणे,दिवाणी प्रकरणे 138 एन.आय ॲक्ट् खालील प्रकरणे,दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच विज वितरण विभाग, नगरपालिका,ग्रामपंचायत, भारत दूर संचार निगम यांच्या पाणीबिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे सदर लोकअदालती मध्ये ठेवली जाणार आहेत. याबरोबरच राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांचेकडील थकबाकीबाबत वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
या लोकन्यायालयात प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा होणारा अपव्यय वाचतो. पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो तसेच जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे तसेच  या लोकअदालतीचा जास्तीत जास्त् लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मु.गो.सेवलीकर यांनी केले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक