जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी सुविधांची निश्चिती करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी




        अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका)-  प्रत्येक दिव्यांग व्यक्तीस आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 2567 मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा असल्याची निश्चिती करा. त्याच अहवाल येत्या 15 दिवसांत देऊन जेथे सुविधा नाहीत तेथे त्या सुविधा निर्माण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
 दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर सेवा सुविधा पुरविण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांसंदर्भात निवडणूक यंत्रणेस मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेस  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, अपंग संघटनेचे साईनाथ पवार, प्रिझम सामाजिक सेवा संस्थेच्या प्रणिता गोंधळी यांच्यासह सर्व उपविभागीय व तहसिल कार्यालयांतील निवडणूक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी बोधे यांनी प्रास्ताविकात सांगितले की,  दिव्यांग मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी   मतदान केंद्रांवर पुरवावयाच्या सुविधांबाबत, त्यात येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हा उपक्रम आहे.
 जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की,  जिल्ह्यातील सव ग्राम्पंचायतींमार्फत गावांतील दिव्यांगांची नोंदणी ची यादी घ्यावी. त्यानुसार मतदान केंद्र निहाय दिव्यांगांची संख्या निश्चिती करावी. त्यानुसार सुविधांची उपलब्धता करावी. दिव्यांग मतदारांची संख्या जास्त असल्यास विशेष मतदान केंद्रही उभारण्याबाबत कारवाई करावी, अशा सुचना यावेळी त्यांनी केल्या.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड