राज्य शासनाच्या बँकामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना व बीज भांडवल योजनांमध्ये सुधारणा

रायगड(जिमाका)दि.11:- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे दि.28 फेब्रुवारी 2024 च्या परिपत्रकान्वये प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय (PM-AJAY) च्या मार्गदर्शक सुचनानुसार विविध योजनेंतर्गत प्रति लाभार्थी देण्यात येणारी अनुदान रक्कम रु. 10,000/- वरुन रु. 50,000/- करण्यात आली असल्याने राज्य शासनाच्या बँकामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना व बीज भांडवल योजनांमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत. 50 टक्के अनुदान योजना :- प्रकल्प मूल्य, सद्य:स्थितीतील योजना रु. 50 हजार, वाढीव अनुदानानुसार योजना, रु. 50 हजार. महामंडळाचा सहभाग, रु. 10,000/- (अनुदान), प्रकल्प मुल्याच्या 50 टक्के (रु.25,000/-) अनुदान, बँकेचा सहभाग, रु. 40,000/- बँकेचे कर्ज, 50 टक्के (रु.25,000/-) बँकेचे कर्ज, व्याज दर, बँकेच्या नियमाप्रमाणे, परतफेडीचा कालावधी, 3 वर्ष. बीजभांडवल योजना :- महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भागभांडवलामधून बीजभांडवल योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. प्रकल्प मूल्य, सद्य:स्थितीतील योजना रु. 5 लाख, वाढीव अनुदानानुसार योजना, रु. 5 लाख, महामंडळाचा सहभाग, 20 टक्के (रु. 10,000/- अनुदानासहीत )(रु.90,000/- महामंडळाचे कर्ज + रु. 10,000/- अनुदान), 20 टक्के (रु. 50,000/- अनुदानासहीत) (रु.50,000/- महामंडळाचे कर्ज + रु. 50,000/- अनुदान), बँकेचा सहभाग-75 टक्के (रु.3,75,000/- बॅकेचे कर्ज), 75 टक्के (रु.3,75,000/- बॅकेचे कर्ज), अर्जदाराचा सहभाग, 5 टक्के (रु.25,000/-),5 टक्के (रु.25,000/-), व्याज दर, 4 टक्के महामंडळाचे कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्ष. या योजनांच्या अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मर्या.जिल्हा कार्यालय, रायगड, कृष्ण संगम बिल्डींग चेंढरे अलिबाग बायपास रोड, पहिला मजला, ब्लॉक न.103 अलिबाग येथे संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक एस.आर.म्हसकर यांनी कळविले आहे. ००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक