पेण येथे आजपासून (दि.7) जिल्हास्तरीय कृषी, पशु प्रदर्शन व शेतकरी मेळावा



अलिबाग, जि. रायगड, दि.6 (जिमाका)- रायगड जिल्हा परिषद व कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने  गुरुवार दि. 7 पासून जिल्हास्तरीय भव्य  कृषी, पशुप्रदर्शन,विक्री , चर्चासत्र व शेतकरी मेळाव्याचे आयोजन पेण येथे करण्यात आले आहे. हे प्रदर्शन हॉटेल मॉर्क्वीस मंथन शेजारी, मुंबई- गोवा महामार्ग पेण येथे होणार आहे, या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन व शेतकरी मेळावा दि. 7 ते 11 फेब्रुवारी असे पाच दिवस चालणार असून या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन सोहळा
 या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि.7 रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी  राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम, मदत व पूनर्वसन व कृषी मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील हे राहणार असून  मुख्य उद्घाटक म्हणून  जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे या उपस्थित राहणार आहेत तर मेळाव्याचे उद्घाटक म्हणून विधान परिषद सदस्य आ. जयंत पाटील,  पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटक विधानसभा सदस्य आ. सुभाष उर्फ पंडीतशेट पाटील, रानमेवा बाहार उद्घाटकआ. धैर्यशील पाटील,  कृषी प्रदर्शन उद्घाटक माजी मंत्री सुनिल तटकरे, कामधेनू सभागृह उद्घाटक श्रीमती मिनाक्षीताई पाटील, पशुपक्षी प्रदर्शन उद्घाटक माजी आमदार विवेकानंद पाटील यांची उपस्थित राहणार आहे. यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना. अनंत गिते, राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, लोकसभा सदस्य खा. श्रीरंग बारणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. या सोहळ्याला सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, विधान परिषद सदस्य आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे,  विधानसभा सदस्य आ. सुरेश लाड, आ. भरत गोगावले, आ. अवधुत तटकरे, आ. मनोहर भोईर,  तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती ॲड आस्वाद पाटील,समाजकल्याण सभापती नारायण डामसे, महिला बालकल्याण सभापती उमा संदीप मुंढे, शिक्षण व आरोग्य सभापती नरेश तातूराम पाटील,  प्रधान सचिव अनुपकुमार, विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील,  पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर,  जिल्हा पशुसंवर्धन  उपायक्त डॉ. सु.चि. म्हस्के,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  पांडुरंग शेळके,   प्रादेशिक सह आयुक्त डॉ. एम.एल. साळवे, विभागीय कृषी संचालक विकास पाटील,   जिल्हा परिषदेतील पक्ष प्रतोद सुधाकर घारे, बाजीराव परदेशी, अमित जाधव, पेण पं.स. सभापती स्मिता पेणकर,  विरोधीपक्ष नेता सुरेंद्र म्हात्रे  तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सदस्य रविंद्र पाटील. मधु पारधी,  सुधाकर घारे, मीना गाणेकर, पदीबाई ठाकरे,  दीपिका दरेकर, योगिता पारधी, पद्मा पाटील,  महादेव दिवेकर,  आरती मोरे,  दौपदी पवार,  संजय कचरे,  प्रिया पेढवी, सपना मालुसरे, निता घाटवळ, कांचन पारंगे  आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर राज्यस्तरीय नृत्याविष्कार होणार आहे.
 शुक्रवार दि. 8 रोजी सकाळी साडे अकरा वा. पणन मंडळाच्या योजना या विषयावर महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे व्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांचे  तसेच दुपारी दीड वा. मत्स्य शेतीतून  निलक्रांती … संधी आणि आव्हाने या विषयावर कृषी विज्ञान केंद्राचे  शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक यांचे व्याख्यान होईल. सायं पाच वा. राज्यस्तरीय ब्रास बॅंड स्पर्धा होईल.
शनिवार दि. 9 रोजी सकाळी साडेअकरा वा.  गटशेती, सेंद्रीय भाजीपाला लागवड व मार्केटींग या विषयावर कृषी तज्ज्ञ ज्ञानेश्वर बोडके यांचे तर दुपारी दीड वा.  मुक्तसंचार गोठा व चारा व्यवस्थापन या विषयावर दुग्ध व्यवसाय सल्लागार डॉ. शैलेश मदने  यांचे व्याख्यान होईल. तर दुपारी तीन वा. अत्याधुनिक कुक्कुटपालन व त्यामधील संधी या विषयावर डॉ. दिनेश भोसले यांचे व्याख्यान होईल. याच दिवशी सकाळी 9 ते सायं 7 या वेळात जिल्हासतरिय कबड्डी स्पर्धाही होतील . यावेळी ऑलिम्पिक धावपटू  ललिता बाबर्व प्रो कबड्डी खेळाडू डॉ. संदीप भोसले यांची विशेष उपस्थिती राहिल. सायं. 7 वा. नंतर सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
रविवार दि.10 रोजी सकाळी साडेअकरा वा.  कमी खर्चात दुग्ध उत्पादन कसे वाढवावे? या विषयावर दुग्धव्यवसाय सल्लागार डॉ. चंद्रशेखर संत  यांचे तर दुपारी दीड वा. सेंद्रीय शेती याबाबत  सुपा बायोटेकचे नितीन वारके यांचे व्याख्यान होईल. सायं. 7 वा. पासून सांस्कृतिक कार्यकम होतील.
सोमवार दि. 11 रोजी सकाळी 11 वा. अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस पुरस्कार सोहळा, दुपारी दोन वा. अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस प्रशिक्षण कार्यक्रम, सायं. 5 वा. राज्यस्तरीय ढोल स्पर्धा या प्रमाणे कार्यक्रम होणार आहेत.
 या कार्यक्रमांना जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास सभापती प्रमोद पाटील,अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आर्ले, गटविकास अधिकारी पेण चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक