मतदार हेल्पलाईन (1950) कार्यान्वित



          अलिबाग, जि. रायगड, दि.5 (जिमाका)- आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार मतदारांना माहिती उपलब्धतेसाठी  1950 या टोल फ्री क्रमांकावर मतदार हेल्पलाईन  (District Contact Centre (District Voter Helpline) विनामूल्य सेवा कार्यान्वीत करण्यात आली आहे.
            राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून दि. 25 जानेवारी, 2019 रोजी  जिल्ह्यात 1950 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वीत करण्यात आला आहे.
हा टोल फ्री क्रमांक सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यान्वीत असेल.या क्रमांकासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांचेमार्फत एका जिल्हा संपर्क अधिकारी (District Contact Officer) व दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  या क्रमांकावरुन मतदारांना त्यांचे मतदार यादीतील तपशीलाबाबत व मतदान केंद्राबाबत इत्यादी माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल.  या क्रमांकावर मतदारांकडून प्राप्त तक्रारीची नोंद ही NGSP (National Grievance Services Portal) वर घेण्यात येईल. तसेच सदर तक्रार ही संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना NGSP (National Grievance Services Portal) वरुन पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल. या टोल फ्री क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक कॉलचे CMS (Call Recording System) द्वारे संगणकावर त्याची रेकॉर्डींग जतन केली जाणार आहे. तरी सर्व मतदारांनी 1950 ह्या टोल फ्री क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करुन मतदार यादी शुध्दीकरणाच्या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन  जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक