एचआयव्ही जनजागृतीसाठी मॅरेथॉन स्पर्धाःपेणची ऋतुजा सकपाळ तर उरणचा करण माळी प्रथमःसहभागी स्पर्धकांना जिल्हा प्रशासनातर्फे दाखवणार ‘उरी’चा विशेष शो

अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)-राष्ट्रीय युवा दिन व पंधरवडा निमित्त, मा- प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्यामार्फत अलिबाग समुद्र किनारा येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत पेण ची ऋतुजा सकपाळ तर उरण येथील करण माळी यांनी अनुक्रमे महिला व पुरुष गटातील विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या युवक युवतींना प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘ उरी’ हा देशभक्तीपर चित्रपट विशेष शो आयोजित करुन दाखवण्यात येईल,असे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी जाहीर केले.
अलिबाग समुद्र किनाऱ्यावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, लायन्स क्लब श्रीबागचे अध्यक्ष विजय वनगे, डॉ. ॲड.निहा राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने हे उपस्थित होते.
            युवक युवतींमध्ये एचआयव्ही- एड्स जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग यांच्यामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय युवा दिन व पंधरवडा निमित्त अलिबाग समुद्र किनारा येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जे.एस.एम. कॉलेज, पी.एन.पी. कॉलेज, जा.र.हा.कन्याशाळा, नर्सिंग स्कूल, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, स्पर्धा विश्व ॲकेडमी अशा विविध महाविद्यालयांतील युवक युवतींनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत महिला गटामध्ये
कु.ऋतुजा जयवंत सकपाळ, पेण हिने प्रथम क्रमांक,
कु.दर्शना दत्तात्रय पाटील, पेण हिने व्दितीय क्रमांक,
तर कु.प्रतीक्षा प्रदीप कुलपे, उरण हिने तृतीय क्रमांक पटकावला.
पुरुष गटामध्ये
कु.करण हरिश्चंद्र माळी, उरण ह्याने प्रथम क्रमांक
कु. रामू गणपत पारधी, नागोठणे ह्याने व्दितीय क्रमांक
कु. प्रणित राजेंद्र गावंड, सुतारपाडा याने तृतीय क्रमांक पटकावला.
विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व अन्य मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
 या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या युवक-युवतींना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘उरी’ या देशाचे रक्षण करण्याकरिता कर्तव्य दक्ष सैनिकांवर आधारित चित्रपट सिनेमा हॉल मध्ये मोफत दाखविण्यात येईल,असे जाहीर केले.
यावेळी माजी. कॅप्टन उमेश वाणी, इतिराज पाटील, तपस्विनी गोंधळी, तसेच कॉलेजमधील प्राध्यापक हे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक नवनाथ लबडे, जिल्हा सहाय्यक लेखा रवींद्र कदम,जिल्हा सहाय्यक एम अँड इ. सौ. रश्मी सुंकले,जिल्हा सहाय्यक कार्यक्रम श्रीम. संपदा मळेकर, समुपदेशक कल्पना गाडे, अर्चना जाधव, राजकुमार बिराजदार,प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमित सोनवणे, गणेश सुतार, हेमकांत सोनार, वाहनचालक किरण पाटील, महेश घाडगे, क्लिनर रुपेश पाटील यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड