‘आपत्ती प्रतिसाद निधी’उभारणारा ‘रायगड’ ठरला पहिला जिल्हा


अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)-  विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीप्रवण असणाऱ्या रायगड जिल्ह्याला आपत्ती प्रसंगी मदत व बचावासाठी स्वतःचा निधी असावा, ही संकल्पना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मांडली. त्यानुसार जिल्ह्याचा स्वतःचा ‘आपत्ती प्रतिसाद निधी’ उभारण्याचे ठरले. जिल्ह्यातील विविध उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायीत्व निधी अर्थात ‘सीएसआर’ फंडातून हा निधी उभारण्यात जिल्ह्याला यश आले असून प्रारंभीच 15 लाख रुपये निधी जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी जमा ही झाला आहे. ही सुरुवात आहे. परंतू अशाप्रकारे स्वतःचा आपत्ती प्रतिसाद निधी उभारणारा रायगड जिल्हा हा राज्यातला पहिलाच जिल्हा ठरला आहे हे विशेष!
ऐतिहासिक महत्त्व व विविध निसर्ग सौंदर्याने नटलेला रायगड जिल्हा हा तसा विविध आपत्तीप्रवण जिल्हाही आहे. जिल्ह्यात पूर, दरड कोसळणे, तसेच समुद्र किनारा लगत असल्याने चक्री वादळ, त्सुनामी इ. नैसर्गिक आपत्ती व विविध मानवनिर्मित आपत्तींच्या घटनांचा धोका संभवत असतो. अशा वेळी जिल्ह्यातील नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती प्रवणता विचारात घेऊन सक्षम प्रतिसाद आणि धोके सौम्यीकरणासाठी जिल्ह्यातील विविध उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी निर्माण करण्याचा निर्णय रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला. असा निर्णय घेणारा व निधी निर्माण करणारा ‘रायगड’ हा राज्यातला पहिलाच जिल्हा ठरला आहे. जिल्ह्यातील विविध उद्योग प्रतिष्ठानांनी निधी देण्यास प्रतिसादही देऊ केला आहे. आज अखेर याद्वारे 15 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. नुकतेच या निधीसाठी दीपक फर्टिलायझर्सशी संलग्न ईशान फाऊंडेशन यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे आज सुपूर्द केला. तसेच IGPL लि. व गॅलॅक्सी सरफक्टंट प्रा.लि तळोजा यांनी देखील प्रत्येकी रु. 5 लाख निधी जिल्हा आपत्ती प्राधिकरणास उपलब्ध करून दिला आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी, दीपक फर्टीलायझर्सचे उप महाव्यवस्थापक संतराम चलवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक हे उपस्थित होते. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सह संचालक एम आर. पाटील यांची हा निधी प्राप्त करण्यासाठी समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे.
या निधीतून जिल्ह्यातील आपत्कालीन प्रसंगी शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक साहित्य, मनुष्यबळ उपलब्ध करणे, प्राथमिक वैद्यकीय सेवा, मदत कार्य इत्यादी अनेक आपत्कालीन कार्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. जिल्ह्यातील इतरही कंपन्यांनी पुढे येऊन सीएसआर मधून निधी मंजूर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा आपत्ती मध्ये गरजू अपद्ग्रस्तांना तातडीने मदत मिळेल,अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागरकुमार पाठक यांनी दिली आहे. या सोबत जिल्हा आपत्ती  प्रतिसाद दलही स्थापन करण्यात आले असून  या निधीतून  मदत व बचाव कार्य करणाऱ्या संस्था, स्वयंसेवकांना  योग्य प्रशिक्षण, साहित्य आणि जीवन सुरक्षा विमा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Comments

  1. उत्तम संकल्पना सत्यात उतरलेली पाहताना आनंद होत आहे.

    ReplyDelete
  2. रायगड जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवशी यांचे हर्दिक अभिंनदन आपत्ति न सागता येते पण त्या सठि ते घेत असलेलि कालजिअति शय मह्त्वची आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक