रायगड जिल्ह्याची मतदार यादी प्रसिद्ध : 22 लाख 1 हजार 326 मतदार बजावणार मतदानाचा हक्क



अलिबाग, जि. रायगड, दि.5 (जिमाका)- आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी  महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2019  या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी दि. 31 जानेवारी. 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. ही मतदार यादी जिल्ह्यातील 2693 मतदान केंद्रांवर, मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरही प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान या मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण 22 लाख 1 हजार 326 मतदार नोंदणी झालेली असून हे मतदार येत्या निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावतील.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, दि. 01.09.2018 रोजी प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीनुसार जिल्ह्यात 10 लाख 98 हजार 727 पुरुष मतदार,  तर 10 लाख 55 हजार 641 महिला मतदार व 04 इतर मतदार होते. त्यानंतर राबविण्यात आलेल्या पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यात मतदार नोंदणी जी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर करण्यात आली.  त्यात नवीन नाव नोंदणी, नाव वगळणी, पत्ता बदल इ. पुनरिक्षण करण्यात आले. त्यानंतर दि. 31.01.2019 रोजी अंतिम मतदार यादीनुसार रायगड जिल्ह्यात 11 लाख 19 हजार 743 पुरुष मतदार, 10लाख 80 हजार 513 महिला मतदार व अन्य 3 मतदार असे एकूण 22 लाख 259 मतदार नोंदविण्यात आले. तसेच  1057 सर्व्हिस मतदार व 10 एनआरआय मतदार  यांचा समावेश करुन जिल्ह्यात एकूण 22 लाख 1 हजार 326 मतदार नोंदणी झाली आहे.
गेल्या वेळच्या यादी नुसार या पुनरीक्षण कार्यक्रमानंतर जिल्ह्यात 21 हजार 16 पुरुष मतदार व 24 हजार 872 स्त्री मतदारांची वाढ झालेली असून 01 तृतीय पंथी मतदार यांची वगळणी झालेली आहे. अशी एकूण 45,887 मतदारांची वाढ झाली आहे.
या अंतिम मतदार यादीनुसार रायगड जिल्ह्यात मतदार यादी फोटो असलेले एकूण 20 लाख 96 हजार 599 मतदार असून त्याची टक्केवारी 95.29% आहे. तसेच मतदार ओळखपत्र असलेले एकूण 21 लाख 13 हजार 623 मतदार असून त्याची टक्केवारी 96.06% आहे. त्याचप्रमाणे मतदार यादीतील महिला मतदारांचे प्रमाण हे 1000 पुरुष मतदारांमागे 965 आहे.
निरंतर मतदार नोंदणी सुरु आहे. त्यासाठी जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. निवडणूक नामनिर्देशन  दाखल होईपर्यंत ज्या ज्या मतदारांची नावे नोंदविली जातील त्यांची स्वतंत्र पुरवणी यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी व मतदार यादी अचूक व शुध्दीकरण करण्यासाठी आपले अनमोल सहकार्य करावे असे आवाहन, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक