लोकसभा निवडणूक 2019 जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारी आढावा


अलिबाग, जि. रायगड, दि.5 (जिमाका)- आगमी लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक यंत्रणा तयारी करत आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पूर्वतयारीचा आढावा एका संयुक्त बैठकीत घेतला. या बैठकीस जिल्हा निवडणूक यंत्रणेतील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व अन्य यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या समवेत  अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अपर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक, प्रभारी आदी उपस्थित होते.
 जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील  कायदा सुव्यवस्था, निवडणूक आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तयार करावयाची भरारी पथके, संवेदनशिल, अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांची वर्गवारी करणे, मतदान केंद्रांवरील सुविधांची समिक्षा आदींचा आढावा घेतला. यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करावी, असे निर्देशही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक