सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्याकरिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन

 

अलिबाग,दि.20 (जिमाका):- समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत दि.17 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्राच्या माध्यमातून जात पडताळणी प्रमाणपत्र, भारत सरकार शिष्यवृत्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, करियर मार्गदर्शन इत्यादीबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अलिबाग व रोहा येथे नगरपरिषदेच्या सहकार्यातून आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे व्याख्यान व आरोग्य तपासणी शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

तरी ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, महाविद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थीनी व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी/विद्यार्थीनींनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक