बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांनी कंत्राटी काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव दि.3 ऑक्टोबर पर्यंत सादर करावेत


अलिबाग,दि.22 (जिमाका):- बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याच्या उद्देशाने  रु.3 लाख पर्यंत इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांकडून कंत्राटी कामांकरिता पत्र प्राप्त झाले आहे.

ज्या सेवा सोसायट्यांचे कार्यक्षेत्र पेण तालुक्याकरिता आहे, अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास उपरोक्त कंत्राटी काम मिळण्याबाबतचे त्यांचे प्रस्ताव दि.03 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयात स्वहस्ते सादर करावेत.

आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करणे अनिवार्य असून उशिरा प्राप्त झालेले, अपूर्ण स्वरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नसल्याची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा कार्यालयाच्या 02141-222029 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अ.मु.पवार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक