“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता..सेवा पंधरवडा”, जिल्हा प्रशासनाचा शून्य प्रलंबिततेचा संकल्प

 

नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीमेची आढावा बैठक संपन्न



अलिबाग,दि.22 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दि.17 सप्टेंबर ते दि.02 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने आपले सरकार, नागरी सेवा केंद्र व इतर वेबपोर्टलवरील नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने शून्य प्रलंबिततेचा संकल्प केला आहे. त्यानुषंगाने या मोहिमेच्या कार्यवाहीबाबतच्या सद्य:स्थितीचा आढावा दूरदृष्यप्रणालीद्वारे अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशट्टी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

या विशेष मोहिमेंतर्गत विविध विभागांच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण, पंतप्रधान किसान सन्मान निधीचा प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ,  फेरफार नोंदीचा निपटार, शिधापत्रिकांचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजूरी, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकांचे नाव, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्कपट्टे मंजूर करणे, दिव्यांगांना प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र अशा चौदा सेवांचा  प्रामुख्याने समावेश आहे.

नागरिकांनी आपल्या नजिकच्या शासकीय कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या प्रलंबित अर्जाचा निपटारा करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने या बैठकीच्या माध्यमातून केले आहे.

याशिवाय या बैठकीत लम्पी आजार व त्यावरील उपाययोजना, ई-फेरफार आदी विषयांबाबतचाही आढावा घेण्यात आला.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक