इच्छुकांनी कर्जत येथील मुलांचे निरीक्षणगृहातील निमवैद्यकीय कंत्राटी तत्वावरील पदासाठी अर्ज करावेत

 


 

अलिबाग,दि.21 (जिमाका):- जिल्हा प्रादेशिक परीविक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह कृषी उत्पन्न बाजार समिती आवार कर्जत मुरबाड रोड, एच.पी.पेट्रोल पंपासमोर दहिवली कर्जत या ठिकाणी निमवैद्यकीय कर्मचारी हे एक पद 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर भरावयाचे आहे. याकरिता दि. 28 मार्च 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु निमवैद्यकीय या पदासाठी अल्प प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार निमवैद्यकीय या पदासाठी पुन:श्च पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र दि.28 मार्च 2022 रोजीच्या जाहिरात नुसार निमवैद्यकीय कर्मचारी या पदासाठी अर्ज केले आहेत, त्यांनी अर्ज पुन:श्च सादर करू नयेत.  

निमवैद्यकीय कर्मचारी कंत्राटी पदसंख्या 1 असून यासाठी रु.9 हजार मासिक मानधन आहे. याकरिता मान्यताप्राप्त संस्थेची ए.एन.एम./जी.एन. एम.पदवी अशी शैक्षणिक अर्हता आहे.  तर वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असून  वैद्यकीय क्षेत्रात कामकाजाचा अनुभव असल्यास  त्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

 इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दि.21 सप्टेंबर ते दि.30 सप्टेंबर 2022 पर्यंत या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग नीलपुष्प बिल्डिंग, एमआयडीसी ऑफिस समोर, नागडोंगरी चेंढरे, अलिबाग या कार्यालयाकडून अर्ज घेऊन परिपूर्ण अर्ज करावेत.  दि.30 सप्टेंबर 2022 वेळ सायं.6.00 वाजेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

 हे पद 11 महिन्याकरिता पूर्ण अस्थायी व कंत्राटी तत्वावर असल्याने शासनाच्या आरक्षणाबाबत व इतर बाबींचे कोणतेही नियम लागू नाही.  अर्ज स्विकृत झालेल्या पात्र उमेदवारास मुलाखतीस बोलविण्यात येईल. अर्ज स्विकृत करण्याचे, पदांच्या संकेत बदल करण्याचे, कंत्राटी पदभरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यात कोणत्याही कारणास्तव रद्द/स्थगित करण्याचे अंतिम अधिकार निवड समितीस राहतील.  अर्जदार हा अनाथ असल्यास त्याच्याकडे महिला बाल विकास विभागाचे अनाथ प्रमाणपत्र असल्यास, परीविक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षण गृह, बालगृह व संस्थेतील कार्यरत/अनुभवी मानधरी कर्मचारी असल्यास, उमेदवार स्थानिक रायगड जिल्ह्यातील असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल.  

अधिक माहितीसाठी परिविक्षा अधिकारी योगीराज जाधव (मो. क्र. 9970122663), संस्था अधीक्षक श्रीमती सुजाता सपकाळ (मो.क्र.7775018197) यांच्या संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक