जिल्हा व सत्र न्यायालयातील ऑल-इन-वन संगणकांच्या देखभालीसाठी वार्षिक देखभाल कराराकरिता इच्छुकांनी निविदा सादर करण्यास दि.26 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

 


 

             अलिबाग,दि.18 (जिमाका):- उच्च न्यायालय, मुंबई यांच्यामार्फत रायगड-अलिबाग मुख्यालय, पनवेल, माणगाव, कर्जत, खालापूर, मुरूड, पाली, पेण, रोहा, श्रीवर्धन, उरण येथे सन 2016 मध्ये एच.पी. ऑल-इन-वन संगणक पुरविण्यात आलेले आहेत. एकूण 172 ऑल-इन-वन संगणकांची एकूण मूळ किंमत 68 लाख 39 हजार 107 रुपये आहे.

             या ऑल-इन-वन संगणकांच्या देखभालीसाठी वार्षिक देखभाल करार (Comprehensive Annual Maintenance Contract) करण्याकरिता विहित नमुन्यातील मोहरबंद निविदा / दरपत्रक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रायगड-अलिबाग या नावाने सीलबंद लखोट्यामध्ये दि.23 सप्टेंबर 2022 पूर्वी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे सादर करावीत अथवा व्यक्तिश: आणून द्यावीत. त्यानंतर प्राप्त निविदांचा /दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. याशिवाय कोणतेही कारण न सांगता प्राप्त झालेल्या मोहरबंद निविदा/दरपत्रके स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्व अधिकार जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे रायगड-अलिबाग जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधकांनी कळविले आहे. तसेच ऑल-इन-वन संगणकांची यादी, वार्षिक देखभाल करारासंबंधीच्या शर्ती व अटीबाबतचे पत्रक सोबत जोडले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक