रायगड जिल्हा माहिती भवन उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा यशस्वी पाठपुरावा

 


 

अलिबाग,दि.10(जिमाका):- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'मुख्यालयाचे बळकटीकरण व विभागीय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती भवन इमारत बांधकाम' योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यानुषंगाने रायगड येथे सुसज्ज असे जिल्हा माहिती भवन लवकरच साकारण्यात येणार आहे.

    जिल्ह्यात विकास संवादाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व संकल्पना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यास मदत होणार आहे. या अद्ययावत जिल्हा माहिती भवनामध्ये जिल्हा माहिती कार्यालय, मिनी थिएटर, मिनी स्टुडीओ, माहिती व तंत्रज्ञान कक्ष, प्रदर्शन दालन,  विविधोपयोगी सभागृह, डिजीटल वाचनालय, मिडीया संनियंत्रण कक्ष, प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरीता अद्ययावत प्रसारमाध्यम कक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र असणार आहे.

     रायगड जिल्हा हा औद्योगिक व पर्यटनाच्यादृष्टीने पसंतीचा आहे. जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, कोंकण रेल्वे, सागरी वाहतूक या माध्यमातून येणारे पर्यटक व लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील बहुतांश जनता शेती व पारंपरिक मासेमारी व्यावसायिक असून ग्रामीण, डोंगराळ व दुर्गम भागात वास्तव्यास आहे. शासनाच्या योजनांची तसेच शासनाच्या विविध कामांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत तत्परतेने पोहोचविणे, ही एक अत्यावश्यक बाब आहे. आधुनिक काळाच्या आवश्यकतेनुसार जिल्हा माहिती कार्यालयात माहिती व तंत्रज्ञानावर आधारीत अत्याधुनिक इमारत व सुसज्ज मनुष्यबळ असणार आहे. माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या दूरदृष्टीने कार्यरत होणाऱ्या रायगड जिल्हा माहिती भवनामुळे विविध जनसंपर्क सेवा उपलब्ध होणार आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक