अलिबाग नगरपरिषदेचे कोविड साखळी रोखण्याकरिता महत्वाचे पाऊल वेळेत निदान..वेळेत उपचार

 



अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):- अलिबाग नगरपरिषदेने कोविड प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी  खाजगी प्रयोगशाळा एरोहेड सर्व्हिसेस पनवेल, यांच्या सहकार्यातून अलिबागमधील ज्येष्ठ नागरिक हॉल, येथे आज गुरुवार, दि. 22 एप्रिल पासून कोविड चाचणी केंद्र सुरु केले आहे.

              अलिबाग नगरपरिषद अध्यक्ष  प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी , अलिबाग नगरपालिका प्र. मुख्याधिकारी गोविंद वाकडे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम आजपासून सुरु करण्यात आला आहे.

             या केंद्रातून शासनाने ठरवून दिलेल्या दरात रॅपिड अँटीजेन, आरटीपीसीआर, कोविड अँटीबॉडी अशा विविध वैद्यकीय तपासण्या नागरिक करून घेऊ शकणार आहेत.

            तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी निधी चौधरी व अलिबाग नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी गोविंद वाकडे यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक