जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत, बियाणे व कीटकनाशकांचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी "कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष" सुरु

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):-  सन 2021-22 खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत, बियाणे व कीटकनाशकांचा सुरळीत पुरवठा होणे अत्यंत गरजेचे असल्याने करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच कृषी सेवा केंद्रचालकांना कृषी निविष्ठा पुरवठयाबाबत कोणतीही अडचण येऊ नये,यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग व कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद रायगड येथे "कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष" सुरु करण्यात आले आहेत.    हे सनियंत्रण कक्ष दररोज सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत सुरू राहतील.

       शेतकरी तसेच निविष्ठा विक्रेते यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथील तक्रार निवारण कक्षात  जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक म्हणून विजय तुपसौंदर्य (व्हॉटस्अप)  मो.क्र. 8830704499 यांची तर  कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड येथील तक्रार निवारण कक्षात मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद, श्री.मुनीर बाचोटीकर, (व्हॉटस्अप)  मो.क्र.9823411386 यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या व्हॉटस्अप क्रमांकाद्वारे अथवा controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलद्वारे  संबंधितांच्या शंकांचे निरसन केले जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्रीमती उज्वला बाणखेले यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक