ओबीसी समाजातील विद्यार्थी /विद्यार्थिनींनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा

 

अलिबाग,दि.03 (जिमाका):- ओबीसी महामंडळाकडून समाजातील ओबीसी विद्यार्थ्यांकरिता शासनाने राज्यांतर्गत, देशांतर्गत शिक्षणासाठी रुपये 10 लक्ष व परदेशात शिक्षणासाठी रुपये 20 लक्ष मर्यादेत कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेमध्ये उमेदवाराला बँकेकडील भरलेल्या व्याजाच्या 12 % पर्यंत परतावा मिळणार आहे.

या योजनेच्या लाभाकरिता उमेदवाराचे वय 17 ते 30 वर्ष असावे. महाराष्ट्र राज्य रहिवासी असल्याचा पुरावा, ओबीसी असल्याचा जातीचा दाखला, तहसिलदार यांनी दिलेला कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.8 लक्ष  पर्यंतचा दाखला किंवा नॉन क्रिमीलेअर च्या मर्यादेत, 12 वी मध्ये 60%गुणांसह उत्तीर्ण पाहिजे, उमेदवार व त्याचे पालक यांचे आधारकार्ड, फोटो इत्यादी, आधार लिंक बचत खाते पासबुक, वयाचा पुरावा, शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत आवश्यक कागदपत्रे इ.

ही योजना ऑनलाईन असून महामंडळाच्या www.msobcfdc.org या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करावेत.

राज्य, देशांतर्गत तसेच परदेशी अभ्यास मध्ये येणारे अभ्यासक्रम:- 1.आरोग्य विज्ञान - सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, 2. अभियांत्रिकी - सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम,3. व्यवसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम, 4.कृषी, अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान, दुग्धविज्ञान मधील सर्व संबंधित अभ्यासक्रम इत्यादी.

शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत बँकेने उमेदवाराला वितरीत केलेल्या कर्ज रक्कमेवरील व्याजाची नियमित परतफेड केलेल्या उमेदवाराला केवळ व्याजाचा परतावा महामंडळ उमेदवाराच्या आधार लिंक बँक खात्यात वर्ग करेल .कर्ज परतफेडीचा कालावधी जास्तीत जास्त 5 वर्षे असणार आहे.

ज्या पात्र उमेदवारांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी महामंडळाच्या संकेतस्थळावरून अर्ज सादर करावेत तसेच अधिक माहितीकरिता जिल्हा व्यवस्थापक, शामराव पेजे कोकण इतर मागास आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड किंवा 02141-224448 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागास आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड चे जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक