एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण तर्फे सेवा पंधरवड्यानि‍मित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


 

अलिबाग,दि.03 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांच्या पुढाकारातून रविवार, दि.2 ऑक्टोबर 2022 रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरवणे, हेटवणे कॉलनी येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, अलिबाग वन विभागातर्फे वन्यजीव सप्ताह असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.

यावेळी तरुण भारत वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार श्री.आनंद जाधव, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

श्री.पाटील यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकासह आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे,गीते सादर केली. याप्रसंगी गांधीजी व शास्त्रीजी यांची वेशभूषा केलेल्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक