अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रयरेषेखालील भूमीहीन शेतमजूरांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अर्ज करण्याचे समाजकल्याण विभागाचे आवाहन

 

अलिबाग,दि.03 (जिमाका):- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन 2004-05 पासून राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रयरेषेखालील भूमीहीन कुटूंबांना चार एकर जिरायती (कोरडवाहू) जमीन किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) जमीन उपलब्ध करून देण्यात येते.

लाभाचे स्वरुप:- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहिन शेतकऱ्यांना 4 एकर जिरायत किंवा 2 एकर बागायत शेत जमीन देणे.  ही योजना 100% शासन अनुदानित आहे.

या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांची पात्रता अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहिन शेतकरी असावा, लाभार्थी वय 18 वर्षे वरील व 60 वर्षाखालील असावा अशी असून त्यांनी सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे लाभार्थी जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत, भूमीहिन शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र, दारिद्रयरेषेखाली असल्याबाबतचे प्रमाणपत्र, महिलांसाठी विधवा/परित्यक्ता/ घटस्फोटीत असल्याचा दाखला/पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र, रहिवासी दाखला, रेशनकार्डची सत्यप्रत, वयाबाबतचा पुरावा/ शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म प्रमाणपत्रमहसूल व वन विभागाने गायरान व सिलींगच्या जमिनीचे वाटप केले नाही, याबाबतचे प्रतिज्ञापत्र ही आहेत.

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, कच्छीभवन, नमिनाथ जैन मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग, येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक