शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार;अर्जांसाठी 9 तारखेपर्यंत मुदतवाढ



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतीवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यामध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूसह, संघटक, कार्यकर्ता यांचेसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार तसेच जेष्ठ क्रीडा महर्षीकरीता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासंदर्भात सन २०१४-१५, सन २०१५-१६ व सन २०१६-१७  या तीन वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज मागविण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर, २०१७  पर्यंत मुदत होती. ती आता अंतिम मुदतवाढ दि. ९ डिसेंबर, २०१७ पर्यंत देण्यात आली आहे.
या तीन वर्षासाठी मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरूष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग राज्य संघटनेच्या कार्यकारीणीच्या ठरावासह अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशिल देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mumbaidivsports.com  या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या link वर अर्ज सादर करावेत. तर ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात ११ डिसेंबर पुर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रासह सादर करावेत.
वरील तीन वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत सदर अर्जासोबत १०० प्रमाणपत्राची मर्यादा रद्द करून अर्जदाराने सादर केलेल्या सर्व attachments upload करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूसह, संघटक, कार्यकर्ता यांनी आपले अर्ज 9 डिसेंबर पर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालय येथे सादर करावेत,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक