जागतिक एड्स नियंत्रण पंधरवाड्यास जनजागृती रॅलीने प्रारंभ




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30- जागतिक एड्स नियंत्रण दिन (1 डिसेंबर 2017) व पंधरवाड्याचा  प्रारंभ जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करुन करण्यात आला. जिल्हा रुग्णालयापासून निघालेल्या या रॅलीने अलिबाग शहरातील प्रमुख मार्गांवरुन जनजागृती केली.
या जनजागृतीपर रॅलीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी , पोलीस उपअधिक्षक निगो,  जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांचे शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य ) डॉ. सुहास कोरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभा आधी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी उपस्थितांना एचआयव्ही एडस निर्मूलन व एचआयव्ही ग्रस्थांच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्याबाबत शपथ दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणातून रॅलीची सुरुवात  करण्यात आली. शहरातील महावीर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक बालाजी नाका यामार्गे पुन्हा  जिल्हा सामान्य रुग्णालय प्रांगण येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये नर्सिंग स्कूल व जा.र.ह. कन्या शाळेच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. यावेळी  एचआयव्ही एड्स विषयी घोषवाक्यांद्वारे जनजागृती केली.
हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातील जिल्हा  आयसीटीसी पर्यवेक्षक नवनाथ लबडे, जिल्हा सहाय्यक लेखा रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम.अँड ई. सौ. रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम श्रीम. संपदा मळेकर, आयसीटीसी समुपदेशक श्रीम. अर्चना जाधव, कल्पना गाडे, सचिन जाधव, राजकुमार बिराजदार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. सुजाता तुळपुळे, अमित सोनवणे, गणेश सुतार, विदुला नटे,रक्तपेढी  प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमकांत सोनार,  एआरटीमधील  डेटा मॅनेजर सौ. कोमल लोखंडे, स्टाफ नर्स पल्लवी पडवळ, औषधनिर्माती सायली म्हात्रे, सीसीसी को. आर्डिनेटर श्रीम. प्रेमा खंडागळे, विहान प्रकल्प ओआरडब्लु सौ. जागृती गुंजाळ, वाहनचालक महेश घाडगे, किरण पाटील, क्लिनर रुपेश पाटील, संकेत घरत तसेच प्रिझम संस्थेच्या तपस्वी गोंधळी व स्वयंसिद्धा संस्थेच्या सूचिता  साळवी व सहकारी, नर्सिंग स्कूल व जा.र.ह. कन्याशाळा येथील विद्यार्थिनी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिम सुतार यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.  
एडस जनजागृतीपर उपक्रमांच्या जिल्ह्यातील आयोजनाची रुपरेषाः-
शुक्रवार दि. 1 डिसेंबर, रोजी सकाळी 10 वाजता आनंदीबाई प्रधान कॉलेज नागोठणे येथे आयपीसीएल कंपनी नागोठणे यांचे मार्फत एचआयव्ही / एड्सविषयी माहिती मार्गदर्शन तसेच रांगोली स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. एआरटी केंद्र अलिबाग यांचेमार्फत एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींकरीता स्नेहमेळावा तसेच धिरुभाई अंबानी हॉस्पीटल लोधिवली यांचेमार्फत एचआयव्ही/एड्सविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शुक्रवार दि.  1 डिसेंबर, रोजी जे.एस.डब्ल्यु. डोलवी येथे जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा या कार्यक्रमाचे जे.एस.डब्ल्यु. येथील लेबर कॉलनी येथे दुपारी साडेतीन  वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन करुन सलग पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कालावधीत जे.एस.डब्ल्यु.  स्टील प्रा.लि. डोलवी ता.पेण यांच्या मार्फत मोबाईल आयसीटीसी व्हॅनला डिजिटल आयसीटीसी व्हॅन तयार करुन त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध विभागामध्ये फिरविण्यात येणार आहे. तसेच यावेळी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीचे एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करण्यात येणार आहे.
शनिवार दि.2 डिसेंबर रोजी तहसिलदार पनवेल यांच्यामार्फत तहसिलदार कार्यालय पनवेल येथे डापकू व विहान प्रकल्प पनवेल यांच्या समन्वयाने एचआयव्हीसह जगणाऱ्या व इच्छुक असणाऱ्या व्यक्तींना शासकीय सेवा सवलती (एक खिडकी योजना) एकाच ठिकाणी मिळतील या करीता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.3 डिसेंबर रोजी सायं. 6 ते 7 या वेळेत दि रुरल ॲण्ड यंग फाऊंडेशन पेण  यांच्या मार्फत ऑक्रेस्टाचे आयोजन करुन करमणूकीतून एचआयव्ही/एड्स विषयी शास्त्रीय माहिती देवून इच्छूक असणाऱ्या व्यतींचे एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करण्यात आले आहे.
मंगळवार दि. 5 डिसेंबर रोजी जेएसडब्ल्यु स्टील प्रा.लि. डोलवी पेण येथील इनसाईट प्लॅट मुख्य कॅटीनच्या जवळ घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा सांगता समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये दि रुरल ॲण्ड यंग फाऊंडेशन  पेण यांच्यामार्फत विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती करण्यात आले आहे.
जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा 2017 चे घोषवाक्य माझे आरोग्य माझा अधिकार हे असून डापकू मार्फत विविध स्थलांतरीत कामगार, ट्रक ड्रायर्व्हस, रिक्षाचालक, क्लिनर, कॉलेजमधील युवक युवती विविध कंपन्यांमधील काम करीत असलेले कामगार तसेच हॉटेलमधील कामगार यांचे करीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक