दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे दुचाकी वाहनांच्या नोंदणी क्रमांकाची मालिका संपत असल्याने दुचाकी वाहनांसाठी MH-06/BX ही नवीन मालिका सोमवार दि.4 डिसेंबर, पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या मालिकेतून आकर्षक वा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज पत्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅनकार्ड व पसंतीच्या क्रमांकासाठीच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांचे नावे काढलेल्या फी च्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह दि.4 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी अडीच या कालावधीत सादर करावे.
जनतेच्या माहितीसाठी उपलब्ध क्रमांक व आकारले जाणारे शुल्क याची माहिती कार्यालयात इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दर्शविण्यात येत आहे. एकाच नोंदणी क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज आल्यास महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार नियमित फी व्यक्तिरिक्त सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करण्याऱ्यास सदर नोंदणी क्रमांक देण्यात येईल. दुचाकी मालिकेतून इतर वाहनांसाठी तिप्पट शुल्क भरुन आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करता येईल व अशा अर्जदारास शासकीय महसूल वाढीसाठी प्राथम्य देण्यात येईल.
आकर्षक वा पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठी कार्यपध्दती कार्यालयाच्या सुचना फलकावर लावलेली असून अनधिकृत व्यक्तींकडून फसवणूक टाळण्यासाठी वाहनधारकांनी स्वत:कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक