गोवर रुबेला लसीकरण मोहिम जिल्ह्यात आजअखेर 5 लाख 53 हजार बालकांना लसीकरण
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.3- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने
सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर
रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात सोमवार (दि.02 जानेवारी 2019) अखेर
जिल्ह्यातील 5 लाख 53 हजार 703 बालकांना
लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त
अहवालानुसार काल (बुधवार दि.2) दिवसाअखेर जिल्ह्यातील 28 शाळांमध्ये लसीकरण
राबविले. यात 14 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 645
विद्यार्थ्यांना तर 14 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील
यंत्रणेमार्फत 2 हजार 405 विद्यार्थ्यांना अशा एकूण 3 हजार 50 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात
आले. तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर
एकूण 2 लाख 87 हजार 681 मुले व 2 लाख 66 हजार 22 मुली असे एकूण 5 लाख 53 हजार 703 विद्यार्थ्यांना
लसीकरण करण्यात आले, अशी माहिती जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यांनी दिली
आहे. या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य
यंत्रणा 5405 शाळांपर्यंत पोहोचली आहे.
00000
Comments
Post a Comment