जावळी ता.माणगाव येथे उद्यापासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन



अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.1:- रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग, रायगड-अलिबाग व श्री गोरक्षनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, जावळी संचलित, इंग्लिश स्कूल जावळी व जिल्हा विज्ञान आणि गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  गुरुवार दि. 3 ते  शनिवार दि. 5 जानेवारी या कालावधीत जावळी  ता.माणगाव जि. रायगड येथे जिल्ह्याचे 44 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन  आयोजित करण्यात आले आहे.  
        जिवनातील आव्हानांसाठी वैज्ञानिक उपाय’ ( Science Solution for Challenges in life) हा या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे.    या अनुषंगाने उच्च  प्राथमिकस्तर (इ.6 वी ते 8 वी पर्यंत) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या (इ.9 वी ते 12 वी पर्यंत) शालेय विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासोबत अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (माध्यमिक शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धा सन 2018-19, राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (प्राथमिक शिक्षकांचे) प्रदर्शन  व स्पर्धा, राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर यांचे प्रायोगिक साधनांचे प्रदर्शन व स्पर्धा, लोकसंख्या शिक्षण शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन व स्पर्धा  या स्पर्धा व प्रदर्शनांचे आयोजनही करण्यात आले आहे. 
या विज्ञानप्रदर्शनाचे उद्घाटन विधानपरिषद सदस्य आ. जयंत पाटील, माजी पालकमंत्री सुनिल तटकरे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कु.आदिती तटकरे असणार आहेत.  तर कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते,  राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, लोकसभा सदस्य  खा.श्रीरंग बारणे, विधान परिषद सदस्य आ. बाळाराम पाटील, आ.अनिकेत तटकरे आ.निरंजन डावखरे तसेच विधानसभा सदस्य आ.सुरेश लाड,कर्जत,आ.श्री.सुभाष पाटील, अलिबाग, आ.धैर्यशील पाटील पेण, आ.भरत गोगावले महाड, सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर, आ.अवधूत तटकरे,आ.मनोहर भोईर, उरण,  जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ व बांधकाम समिती आस्वाद पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी  प्रमुख अतिथी  सभापती समाज कल्याण समिती जिल्हा परिषद रायगड नारायण डामसे, सभापती कृषि व पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती प्रमोद पाटील, सभापती महिला व बालकल्याण समिती श्रीम.उमा संदिप मुंढे, विरोधी पक्षनेता जिल्हा परिषद रायगड-अलिबाग सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण उपस्थित राहतील. या विज्ञान प्रदर्शनाचा  शनिवार दि. 5 रोजी दुपारी एक वा.समारोप व पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष कु.आदिती तटकरे व उपाध्यक्ष ॲङआस्वाद पाटील यांच्या हस्ते होणार आहे.  या प्रदर्शनास उपस्थितीचे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती नरेश तातूराम पाटील यांनी तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) भाऊसाहेब थोरात, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) शैलजा दराडे यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक