अंतोरे ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- मा.राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशान्वये ग्रामपंचायत अंतोरे ता.पेण या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी कार्यक्रम जाहीर झाला असून तो पुढील प्रमाणे.  तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्दी सोमवार दि. 7 जानेवारी 2019. नामनिर्देशनपत्र मागविणे व सादर  करणे बुधवार दि. 16  ते मंगळवार दि.22 जानेवारी वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 (रविवार दि.20 जानेवारी हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून).   नामनिर्देशनपत्र छाननी करणे बुधवार दि. 23 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत.    नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम  दिनांक शुक्रवार दि. 25 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत.  निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्दी शुक्रवार दि. 25 रोजी दुपारी 3 वा.नंतर.  आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक बुधवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायं. साडेपाच पर्यंत.  मतमोजणी गुरुवार दि. 7 फेब्रुवारी (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील.) जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक शनिवार दि. 9 फेब्रुवारी .
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक