आपली सुरक्षा परिवाराची रक्षा रस्ता सुरक्षा पंधरवडा विविध उपक्रमांचे आयोजन ---उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने

आपली सुरक्षा परिवाराची रक्षा
रस्ता सुरक्षा पंधरवडा
विविध उपक्रमांचे आयोजन
                                         ---उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने




       अलिबाग दि.7 (जिमाका) जिल्ह्यात दि.  9 ते 23 जानेवारी 2017 या कालावधीत 28 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व अभियान  राबविण्यात येणार आहे.  या निमित्त रस्ता सुरक्षा विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या पंधरवडा निमित्त होणाऱ्या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रस्ता सुरक्षा पंधरवडा यशस्वी करावा, असे आवाहन   समिती सचिव तथा प प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण राजेंद्र मदने यांनी केले आहे.
            या संदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक झाली.  या बैठकीला विभागीय नियंत्रक एस.टी.महामंडळ पेण विभाग,विजय गीते, राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक प्रशांत फेगडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर व इतर अधिकारी उपस्थित होते.  या बैठकीत पंधरवडानिमित्त पुढील कार्यक्रम ठरविण्यात आले.
विविध कार्यक्रम
            सोमवार दि. 9 जानेवारी 2017 रोजी रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे. तसेच रस्ता सुरक्षा साहित्याचे  प्रकाशन, कालेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयी व्याख्यानाचे आयोजन.   पेण व अलिबाग येथे स्कूल बस तपासणी.   पेण येथे शालेय, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, त्यांचेकडून अपेक्षित योगदानाबाबत विवेचन.   अलिबाग येथे यामाहा कंपनी पुरस्कृत फिरत्या व्हॅनद्वारे ऑडिओ व्हीज्युअल माध्यमातून रस्ता सुरक्षा अनिवार्यता प्रबोधन.
मंगळवार दि. 10 जानेवारी - महाड येथे धोकादायक व रासायनिक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या चालकांचे प्रशिक्षण व उजळणी शिबीर.  खालापूर टोलनाका येथे खाजगी विशेष तपासणी विशेष लक्ष, आपत्कालीन दरवाजा,आसन व्यवस्था व शयनिका.  पाली-सुधागड  येथे शालेय,कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, त्यांचेकडून अपेक्षित योगदानाबाबत विवेचन.   महाड गाव येथे यामाहा कंपनी पुरस्कृत फिरत्या व्हॅनद्वारे ऑडिओ व्हीज्युअल माध्यमाने रस्ता सुरक्षा अनिवार्यता प्रबोधन.
 बुधवार दि. 11 जानेवारी - सी.एफ.आय.पेण येथे मोटार वाहन ट्रेनिंग स्कूल प्रशिक्षकांचे उजळणी प्रशिक्षण.  कळंबोली येथे अतिभार वाहतूक तपासणी. विशेष लक्ष टायर्सची परिस्थिती.  अलिबाग येथे शालेय,कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, त्यांचेकडून अपेक्षित योगदानाबाबत विवेचन. वडखळ येथे यामाहा कंपनी पुरस्कृत फिरत्या व्हॅनद्वारे ऑडिओ व्हीज्युअल माध्यमाने रस्ता सुरक्षा अनिवार्यता प्रबोधन.
            गुरुवार दि. 12 जानेवारी - अलिबाग येथे आर.सी.एफ. महाविद्यालय विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन अपघाता पश्चात घ्यावयाची उपाययोजना.   खालापूर येथे सिटबेल्ट न वापरता वाहन चालविणे,अतिवेगाने वाहन चालविणे इत्यादी.  अलिबाग येथे यामाहा कंपनी पुरस्कृत फिरत्या व्हॅनद्वारे ऑडिओ व्हीज्युअल माध्यमाने रस्ता सुरक्षा अनिवार्यता प्रबोधन. म्हसळा येथे शालेय,कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, त्यांचेकडून अपेक्षित योगदानाबाबत विवेचन.
 शुक्रवार दि. 13 जानेवारी - रामवाडी एस.टी.डेपो येथे रिक्षा चालक, एस.टी.चे चालक व पोलीस आणि शासकीय वाहनांचे चालक यांचे नेत्र व आरोग्य्‍ तपासणी.   परिवहन संवर्गातील वाहनांची योग्यता तपासणी. यात ब्रेक सिस्टीम, टायर्स, स्टेअरिंग सिस्टीम व दिवे या बाबीवर विशेष लक्ष.  तळा येथे शालेय,कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, त्यांचेकडून अपेक्षित योगदानाबाबत विवेचन. खालापूर टोल येथे यामाहा कंपनी पुरस्कृत फिरत्या व्हॅनद्वारे ऑडिओ व्हीज्युअल माध्यमाने रस्ता सुरक्षा अनिवार्यता प्रबोधन.
शनिवार दि. 14 जानेवारी - ॲडलॅब इमॅजिका येथे  पर्यटनासाठी आलेल्या  लोकांना ऑडिओ व्हीज्युअर व्हॅनद्वारे रस्ता सुरक्षा सादरीकरण.   मद्यप्राशन करुन वाहन चालविणे व वाहन चालविताना मोबाईलफोनचा वापर संदर्भात खालापूर येथे तपासणी.   श्रीवर्धन येथे शालेय,कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, त्यांचेकडून अपेक्षित योगदानाबाबत विवेचन. 
रविवार दि. 15 जानेवारी -  खालापूर टोल येथे गुणवत्ता पूर्ण वाहन चालविणाऱ्यांना शुभेच्छा व संदेश कार्ड वाटप.   खालापूर येथे वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर यासंदर्भात तपासणी.   यामाहा कंपनी पुरस्कृत फिरत्या व्हॅनद्वारे ऑडिओ व्हीज्युअल माध्यमाने रस्ता सुरक्षा अनिवार्यता प्रबोधन.
            सोमवार दि.16 जानेवारी - रोहा(शिबीर) येथे रस्ता सुरक्षा जनजागृती संबंधी निबंध,वकृत्व स्पर्धा आयोजन व बक्षिस वितरण.   हेल्मेट, मोबाईल फोनवर संभाषण तपासणी.  शालेय,कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, त्यांचेकडून अपेक्षित योगदानाबाबत विवेचन. यामाहा कंपनी पुरस्कृत फिरत्या व्हॅनद्वारे ऑडिओ व्हीज्युअल माध्यमाने रस्ता सुरक्षा अनिवार्यता प्रबोधन.
 मंगळवार दि.17 जानेवारी - मुरुड (शिबीर) येथे रिक्षा व टेम्पो संवर्गातील वाहनांच्या चालकांचे नेत्र व आरोग्य तपासणी.  तळा व म्हसळा तालुका येथे ओव्हर लोड पॅसेंजर व अवैध प्रवासी वाहतूक तपासणी.  मुरुड येथे शालेय,कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, त्यांचेकडून अपेक्षित योगदानाबाबत विवेचन. यामाहा कंपनी पुरस्कृत फिरत्या व्हॅनद्वारे ऑडिओ व्हीज्युअल माध्यमाने रस्ता सुरक्षा अनिवार्यता प्रबोधन.
बुधवार दि.18 जानेवारी - अलिबाग (शिबीर) येथे रिक्षा,टॅक्सी, टेम्पो ,ट्रक व बस संघटनांचे पदाधिकारी, मालक, चालक यांच्या करिता रस्ता सुरक्षा व्याप्तीबाबत व्याख्यान व लेस कॅश यशस्वी होण्याकरिता वापरावयाची साधानांचे (उदा.एटीएम, चिल्लर,एसबी आय. वडी इ.) अपघात ग्रस्त लोकांची मौलाची गरज म्हणजे रक्त या करिता रक्तदान शिबीर.   खालापूर येथे सिटबेल्टचा वापर न करणे,वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करणे याची तपासणी.  अलिबाग येथे शालेय,कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, त्यांचेकडून अपेक्षित योगदानाबाबत विवेचन. यामाहा कंपनी पुरस्कृत फिरत्या व्हॅनद्वारे ऑडिओ व्हीज्युअल माध्यमाने रस्ता सुरक्षा अनिवार्यता प्रबोधन.
गुरुवार दि.19 जानेवारी - श्रीक्षेत्र पाली येथे येणारे भाविकांना व वाहनांच्या चालकांना रस्ता सुरक्षितते संदर्भात प्रबोधन.    खालापूर येथे खाजगी बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेची खातरजमा तसेच टपावरुन माल वाहतूक करणाऱ्या बसेसची तपासणी.  माणगाव येथे शालेय,कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, त्यांचेकडून अपेक्षित योगदानाबाबत विवेचन.
शुक्रवार दि.20 जानेवारी - खारपाडा येथे परावर्तक नसणाऱ्या सर्व प्रकारातील वाहनांना गुणवत्ता पूर्ण परावर्तक बसविणे.  SUPD/RUPD परिवहन संवर्गातील वाहनांना बसविले आहे किंवा कसे याची तपासणी.    पोलादपूर येथे शालेय,कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, त्यांचेकडून अपेक्षित योगदानाबाबत विवेचन.
 शनिवार दि.21 जानेवारी - नगरपालिका मैदान पेण येथे  सहा आसनी वाहन चालकांचे प्रबोधन व क्रिकेट स्पर्धा.  पेण-वडखळ येथे पि.यु.सी. व फिटनेस तपासणी.    महाड नगर पालिका मैदान येथे शालेय,कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, त्यांचेकडून अपेक्षित योगदानाबाबत विवेचन.
 रविवार दि.22 जानेवारी - काशिद बीच येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची प्रदूषण मुक्ती संदेश व स्वच्छता जनजागृतीबाबत वॅकेथॉन.   रसायनी पनवेल येथे धोकादायक व रासायनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांची व चालकांच्या अनुज्ञप्तीची तपासणी.  काशिद बीच व गाव येथे यामाहा कंपनी पुरस्कृत फिरत्या व्हॅनद्वारे ऑडिओ व्हीज्युअल माध्यमाने रस्ता सुरक्षा अनिवार्यता प्रबोधन.    .
सोमवार दि.23 जानेवारी - सकाळी 10 ते सायंकाळी 5.00 पर्यंत समारोप कार्यक्रम.  पोलीस, शासकीय विभाग व एस.टी.मधील चालकांनी विना अपघात सेवा देणाऱ्यांचा सत्कार तसेच वाहतूक मित्रांचा सत्कार व प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रम.
अशा विविध व वैशिष्टयपूर्ण कार्यक्रमाचे पंधरवडा निमित्त करण्यात आले आहे.  संयोजन समितीच्या या बैठकीला नवी मुंबई पोलीस आयुक्तालय तसेच सार्वजनिक बांधकाम, आरोग्य , शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक