सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या पाली-सुधागड येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु
अलिबाग, दि.24 (जिमाका): सामाजिक न्याय
विभागांतर्गत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हे मधली
आळी, राम मंदिर रोड तळ्याशेजारी ता.पाली-सुधागड, जि. रायगड येथे कार्यरत आहे.
या वसतिगृहामध्ये
इयत्ता 8 ची पासून गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त
जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागास,
अनाथ व अपंग यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थीनींकरिता मोफत
निवासव्यवस्था असून नाष्टा दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक,उकडलेली दोन अंडी, सफरचंद,
आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध तसेच भोजन व्यवस्थेमध्ये
जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार
) देण्यात येतो.
अभ्यासाकरिता
लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील विनामुल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक
खर्चाकरिता म्हणून रु.600/- निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय विद्यार्थीनींना रुपये 1 हजार व
महाविद्यालयीन विद्यार्थीनींना रुपये 2 हजार गणेश भत्ता दिला जातो. सर्व
विद्यार्थीनींना छत्री, रेनकोट व गमबुटसाठी रु.500/- भत्ता दिला जातो. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीनींना शैक्षणिक
साहित्य भत्ता रुपये 4 हजार व प्रोजेक्ट भत्ता रुपये 1 हजार दिला जातो. या व्यतिरिक्त
संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रिडासाहित्य, मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
प्रवेशपात्र
विद्यार्थीनींच्या पालकांचे सर्व मार्गानी वार्षिक उत्पन्न अनु.जाती, अनु.जमाती विद्यार्थींनीकरिता
रुपये 2 लाख 50 हजारचे आत, विमुक्त जाती, भटक्या
जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रर्वग, विद्यार्थीनींकरिता रुपये 1
लाखाच्या आत असावे.
ऑनलाईन प्रवेश
अर्जासोबत तहसिलदार यांच्या सहीचा सन 2022-23 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी
अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता पास
झाल्याचे गुणपत्रक, आधारकार्ड या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहेत.
सन 2022-23 या
शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध करण्यात आले
आहेत. अधिक माहितीकरिता गृहपाल, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय
वसतिगृह, पाली-सुधागड श्रीमती एम.जे.नरहरे यांच्याशी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन
वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल श्रीमती एम.जे.नरहरे यांनी केले आहे.
०००००००
Comments
Post a Comment