तहसिलदार आयुब तांबोळी आणि पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी खालापूर तालुक्यातील दरडग्रस्त भागाची केली पाहणी


अलिबाग, दि.27 (जिमाका):- खालापूर तालुक्यातील अतिदूर्गम भागात असलेल्या दरडग्रस्त भागाची खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी, खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते व इतर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.

दरवर्षी खालापूरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून यावर्षी पाऊस पडण्यापूर्वी दरडग्रस्त भाग ताडवाडी (बोरगाव खुर्द) या भागाची पाहणी करून तहसिलदार आयुब तांबोळी व इतर अधिकाऱ्यांनी पोखरवाडी येथील बंधाऱ्याला भेट दिली. यावेळी त्यांनी या भागातील नागरिकांशी चर्चा करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा केली, तर आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी जागा प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर उपलब्ध होणाऱ्या सोयींबाबत चर्चा केली.

यावेळी खालापूरचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी, वावर्ले तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक