जिल्ह्यातील बांधकाम व असंघटीत कामगारांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे कामगार उप आयुक्त प्र.ना. पवार यांचे आवाहन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील मु. पाली आंबेवाडी, पो. गोळवाडी या दुर्गम गावातील विटभट्टीवर काम करणाऱ्या आदिवासी कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याच्या उद्देशाने कामगार उप आयुक्त रायगड-पनवेल कार्यालयामार्फत विशेष मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेंतर्गत ज्या विटभट्टी कामगारांनी अद्याप इमारत व इतर बाधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केलेली नाही, अशा कामगारांना नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन करुन मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. त्याच बरोबर 78 नोंदीत कामगारांची मंडळाच्या माध्यमातून 'एचएलएल' संस्थेमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना अत्यावश्यक संचामधील सोलर टॉर्च, मॉस्कीटो नेट, प्लॅस्टिक मॅट, टिफीन, टिफीन बॉक्स, वॉटर बॉटल, गॅल्वनाइज टंक तसेच राज, हेअरींग प्रोटेक्शन, सेफ्टी हेल्मेट, मास्क, सेफ्टी हॅन्डग्लॉज, सेफ्टी हानेंस, रिफलेक्टर जॅकेट इत्यादीचे वाटप करण्यात आले.

तसेच या विशेष मोहिमेंतर्गत असंघटीत कामगारांची ईश्रम पोर्टलवर नोंदणी करण्याबाबत ही माहिती देण्यात आली. ज्या कामगारांकडे कागदपत्र उपलब्ध आहेत, अशा कामगारांना एकाचवेळी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने इमारत व इतर बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे प्रतिनिधी, नागरी सुविधा केंद्राचे प्रतिनिधी 'एच.एल.एल' वैद्यकीय संस्थेचे प्रतिनिधी तसेच मे. इंडो अलाईड फुड लि. व गुनिना संस्थेचे प्रतिनिधी हे एकाच वेळेस उपस्थित होते. जेणेकरुन या सर्व योजनांची माहिती, नोंदणी, लाभ व आरोग्य तपासणी करण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना मंडळाचे www.mahabocw.in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त नोंदणी करावी तसेच असंघटीत कामगारांना जिल्ह्यातील नागरी सुविधा केंद्र/वैयक्तिक स्वरुपात URL-eshram.gov.in या संकेतस्थळावर ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन कामगार उप आयुक्त, रायगड  प्र.ना. पवार यांनी केले आहे.

या विशेष मोहिमेत कामगार उप आयुक्त प्र.ना. पवार, सहायक कामगार आयुक्त श्रीमती, शितल कुलकर्णी,  व्यवस्थापक जिल्हा नागरी सुविधा केंद्र रायगड  राजेश पाटील तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक