अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

 

अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका):-  नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या रिक्त पदाची पोटनिवडणूक मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.06 डिसेंबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार स्थगित करण्यात आली होती. या स्थगित करण्यात आलेल्या निवडणूका संदर्भातील कार्यक्रम मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी दि.17 डिसेंबर 2021 च्या आदेशान्वये जाहीर केला आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या पदासाठीची पोटनिवडणूक दि.18 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी जाहीर केलेला अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-

नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ- मंगळवार, दि.28 डिसेंबर 2021 ते सोमवार, दि.3 जानेवारी 2022 (दि.01/01/2022 व दि.02/01/2022 या सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून), वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत.

नामनिर्देशनपत्रे छाननी करण्याचा दिनांक व वेळ- मंगळवार, दि.4 जानेवारी 2022, वेळ सकाळी 11.00 पासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक व वेळ- गुरुवार, दि. दि.6 जानेवारी 2022, दुपारी 3.00 वाजेपर्यंत.

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ- गुरुवार, दि. दि.6 जानेवारी 2022, दुपारी 3.00 वा.नंतर.

आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक मंगळवार, दि.18 जानेवारी 2022, वेळ सकाळी 7.30 वा.पासून ते सायं.5.30 वाजेपर्यंत व मतमोजणीचा दिनांक बुधवार, दि.19 जानेवारी 2022, वेळ सकाळी 11.00 वाजता.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करणे दि.24 जानेवारी 2022 पर्यंत.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक