अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती महाविद्यालयीन स्तरावरील प्रलंबित अर्ज 15 पर्यंत निकाली काढण्याच्या सुचना


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11:- भारत सरकारतर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शिक्षण परिक्षा फि दिली जाते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालयांतील प्रलंबित अर्ज येत्या सोमवार दि.15 पर्यंत निकाली काढावयाचे आहेत. या संदर्भात समाज कल्याण आयुक्त, पुणे यांनी 9 जानेवारी 2018 रोजी परिपत्रकाद्वारे सुचना निर्गमित केल्या आहेत. तरी महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी दि.15 पर्यंत अर्ज मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. तसेच महाविद्यालयाकडील प्रलंबित पात्र विद्यार्थी हे शिष्यवृत्ती तसेच शिक्षण  व परिक्षा फी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयांची राहील. तरी 2015-16 व 2017-18 या वर्षातील महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत,असे आवाहन  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक