परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11:- ना.दिवाकर रावते, परिवहन मंत्री, खारभूमी विकास हे शुक्रवार दि.12 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा  जिल्हा दौरा कार्यक्रम  पुढीलप्रमाणे-
शुक्रवार दि.12 जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शासकीय निवासस्थान मेघदूत येथून शासकीय मोटारीने गेट वे ऑफ इंडियाकडे प्रयाण. सकाळी आठ वाजता गेट ऑफ इंडिया येथून स्पीड बोटने मांडवा, अलिबागकडे प्रयाण. साडे आठ वाजता मांडवा अलिबाग येथे आगमन व महर्षी विनोद यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे कार्यक्रमास उपस्थिती.(स्थळ:दि.बा.पाटील महाविद्यालय, अलिबाग). सकाळी अकरा वाजता मांडवा अलिबाग येथून स्पीड बोटने गेट वे ऑफ इंडियाकडे प्रयाण. साडे अकरा वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन व शासकीय मोटारीने शासकीय निवासस्थान मेघदूत कडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक