डॉ.वर्तक यांना मत्स्योद्योगभूषण पुरस्कार





अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या खार जमीन संशोधन केंद्राचे मत्सशास्त्रज्ञ डॉ.विवेक रोहिदास वर्तक यांना  मत्स्योद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोकण विकास प्रतिष्ठान तर्फे वाशी येथे आयोजीत ग्लोबल कोकण महोत्सवात या महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री ना.महादेव जानकर यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त गोविंद बोडके,कोकण विकास प्रतिष्ठानचे संचालक संजय यादवराव, श्री.धारीया तसेच मत्स्य शेतकरी उपस्थित होते.
डॉ.वर्तक यांनी मत्स्यव्यवसाय विषयक संशोधन करुन ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत प्रशिक्षणांच्या माध्यमातून यशस्वीपणे पोहचविण्याचे मत्स्यविषयक कौशल्य विकासाचे कार्य केल्याबद्दल  त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. वर्तक यांनी आपल्या यशामध्ये या पुरस्काराचे श्रेय विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.तपस भट्टाचार्य, संधोधन संचालक डॉ.हळदणकर,विस्तार शिक्षण संचालक डॉ.भावे व खार जमीन शास्त्रज्ञ डॉ.दोडके यांचे असून हा संपूर्ण संशोधन केंद्राचा गौरव आहे असेही त्यांनी यावेळी  सांगितले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक