इतर मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ


            कोकण विभागातील इतर मागासवर्गीय समाज घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी, म्हणून शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे, हे महामंडळ खालीलप्रमाणे कर्ज योजना राबवित असते.
रु.25 हजार पर्यंतची थेट कर्ज योजना-
            उद्देश :- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिला व पुरुष लाभार्थींना रु.25 हजार पर्यंतचे थेट कर्ज किरकोळ व छोट्या व्यवसायाकरीता उपलब्ध करुन देणे. बँकेमार्फत कर्ज मंजूर करतांना येणाऱ्या अडचणी व कर्ज वितरणास होणारा विलंब टाळणे. इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरीबातील गरीब व अत्यंत गरजू व्यक्तींपर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ पोहोचविणे.
            कर्जाची उत्तम मर्यादा :- रु.25 हजार लाभार्थींचा सहभाग व प्रशासकीय शुल्क भरावयाची आवश्यकता नाही.
            व्याज दर :- द.सा.द.शे. 2 टक्के दराने व्याज.
            कर्जाची परतफेड :- त्रैमासिक हप्त्यात 3 वर्षात धनादेशाद्वारे अथवा रोखीने.
            व्यवसाय :- सर्व कायदेशीर किरकोळ व छोटे व्यवसाय.
            अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशील :- तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा मुळ दाखला. ग्रामीण व शहरी भागासाठी लाभार्थींच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.1 लाख. सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र. शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत. निवडणूक ओळखपत्र किंवा आधार कार्डची झेरॉक्स प्रत. पासपोर्ट साई 2 फोटो. विशिष्ट ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लाभार्थींकरीता व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, 7/12 उतारा, फिरता व्यवसाय करणाऱ्या लाभार्थींकरीता वरील अट लागू नाही. वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र/जन्मतारखेचा दाखला. बँकेच्या बचत खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत, त्यावर बँकेचा आय.एफ.सी.सी.कोड, शाखेचे नाव, बचत खाते क्रमांक नमूद असावा. मुळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या स्वसांक्षाकित झेरॉक्स प्रती जोडाव्यात व मुळ कादपत्रे पडताळणीसाठी दाखवावीत.
            वैधानिक कागदपत्रे :- विहित नमुन्यातील करारनामा/जामिनपत्र रु.100/- च्या स्टॅम्पपेपरवर. नमुना क्र.8 व 9 रु. 1 च्या रेव्हन्यु स्टॅम्पवर. कर्जदारास दोन जामिनदार द्याव लागतील.
            योजनेच्या अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.
20 टक्के बीज भांडवल योजना-
            उद्देश :- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र व्यक्तींना स्वयं-रोजगारासाठी राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँक व अग्रणी बँकेने पुरस्कृत केलेल्या बँकाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन देणे.
            कर्जाची उच्चतम मर्यादा व स्वरुप :- रु.5 लाख पर्यंत.  बँकेचा सहभाग- 75 टक्के, राज्य महामंडळाचा सहभाग-20 टक्के, लाभार्थींचा सहभाग-5 टक्के.
            व्याज दर :- महामंडळाच्या कर्जावर द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज. बँकेच्या रक्कमेवर बँकेच्या व्याज दराने (9 ते 12 टक्के व्याज आकारण्यात येईल)
            कर्जाची परतफेड :- 60 मासिक हप्त्यात (5 वर्षात) धनादेशाद्वारे अथवा रोखीने.
        व्यवसाय :- सर्व कायदेशीर व्यवसाय (कृषी संलग्न, पारंपारिक, तांत्रिक, वाहतूक, लघू व सेवा उद्योग इत्यादी)
            अर्जासोबत जोडावयाच्या कादपत्रांचा तपशील :- सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र (इतर मागासवर्गीय). मुळ उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी दिलेला). उत्पन्न रु. 1 लाख. (लाभार्थींच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने वाषिक उत्पन्न). शिक्षा पत्रिकेची झेरॉक्स प्रत. व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, 7/12 उतारा, संमतीपत्र, वाहतूक व्यवसायासाठी वाहतूक परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स इ. जन्म तारखेचा दाखला. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र. स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र (ग्रामपंचायत/नगरपालिका). व्यवसाय प्रकल्प अहवाल व सोबत लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इ. बाबतचे दरपत्रक. पासपोर्ट साईज दोन फोटो. व्यवसायानुरुप इतर आवश्यक दाखले.
            वैधानिक कागदपत्रे :- कर्ज मंजूरीनंतर महामंडळाच्या नियमाप्रमाणे वैधानिक कागदपत्रे करावी लागतील.
            योजनेच्या अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.
-संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, रायगड- अलिबाग. 

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड