अपंग निवृत्तीवेतन व कुटूंबलाभ योजनेचा लाभ घ्या मुरुड तहसिलदारांचे आवाहन


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10:- संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत शासनातर्फे इंदीरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना  राबविण्यात येतात. या योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन  मुरुड तहसिलदार यांनी केले आहे.
या योजनांची माहिती पुढील प्रमाणे-
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना-
            दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील 80 टक्क्याहून जास्त अपंगत्व असलेले तसेच एक किंवा बहूअपंगत्व (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व) असलेले लाभार्थी या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र राहतील. अशा लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रक्कम 200 रुपये व राज्य शासनाकडून 400 रुपये असे एकूण 600 रुपये  प्रति महिना  निवृत्तीवेतन मिळेल. अशा लाभार्थ्यांनी त्वरीत तहसिल कार्यालय मुरुड अथवा संबंधित तलाठी यांच्याकडे संपर्क साधावा.
निकष आणि अटी-
वय 18 ते 65 वर्षाखालील अपंग.,
कुटूंबाचे उत्पन्न- कुटूंबाचे नाव ग्रामीण व शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीत समाविष्ट् असावे.
आर्थिक सहाय्य,निवृत्ती वेतन-प्रतीमहा प्रती लाभार्थी रु.सहाशे निवृत्ती वेतन मिळेल.
पात्रतेची अर्हता- दारिद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे.
अपंगत्वाचे प्रमाणपत्र- जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.तसेच तो लाभार्थी 80 टक्क्याहून जास्त अपंगत्व असलेले तसेच एक किंवा बहू अपंग असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व्) असलेबाबतचा दाखला आवश्यक आहे.
वयाचा दाखला- ग्रामपंचायतीच्या, नगरपालिकेच्या,महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उताराची साक्षांकित प्रत- शाळा सोडल्याचा दाखला.शिधापत्रका.आधारकार्ड अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा ग्रामीण,नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला.
रहिवासी दाखला- ग्रामसेवक,तलाठी,मंडळनिरिक्षक यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवासी दाखला ही ग्राह्य धरण्यात येईल.
शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित, मासिक, आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र ठरणार नाही.
एखादी विशिष्ट प्रकरणी शासनाकडून प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करणेचे अधिकार शासनाला सुद्धा राहतील. 
राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना-
 या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील वय वर्षे 18ते 59 या वयोमर्यादेतील कोणतीही कमवती व्यक्ती(स्त्री किंवा पुरुष) जिचे उत्पन्न कुटूंबाचा चरितार्थ चालविण्यास समर्थ आहेत, अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटूंबास एक रकमी 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते.
निकष व अटी-
अर्ज,फोटो,मृत व्यक्तीचा वयाचा दाखला.,दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव समाविष्ट असल्याचा ग्रामपंचायतीकडील दाखला, मृत्यूचा दाखला, शिधापत्रिका,अर्जदार याचे ओळखपत्र(आधारकार्ड),तलाठी,ग्रामसेवक यांचेकडील रहिवासी दाखला.,तलाठी रिपोर्ट जबाब,पंचनामा
वरील सर्व बाबींची पुर्तता करुन मृत्यूच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आज अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जर असे लाभार्थी असतील तर त्यांनी ताबडतोब तहसिल कार्यालय,मुरुड अथवा संबंधित तलाठी यांजकडे संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन तहसिलदार मुरुड यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक